Heart Attack : वाढदिवशीच लेकीवर आभाळ कोसळलं, क्रिकेटच्या मैदानात बापाला मृत्यूनं गाठलं

Last Updated:

Jalna News : खेळत असतानाच हृदयविकाराचा तीव्र झटक्याने मैदानात कोसळलेल्या खेळाडूचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे त्याच दिवशी त्यांच्या मुलीचा पहिला वाढदिवसही होता.

क्रिकेटच्या मैदानात मृत्यूनं गाठलं, वाढदिवशीच लेकीवर आभाळ कोसळलं
क्रिकेटच्या मैदानात मृत्यूनं गाठलं, वाढदिवशीच लेकीवर आभाळ कोसळलं
जालना: मागील काही महिन्यांपासून हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अशीच एक घटना जालन्यात घडली आहे. क्रिकेटच्या मैदानात गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूला मृत्यूने गाठले. खेळत असतानाच हृदयविकाराचा तीव्र झटक्याने मैदानात कोसळलेल्या खेळाडूचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे त्याच दिवशी त्यांच्या मुलीचा पहिला वाढदिवसही होता.
सोमवारी रात्री भोकरदन तालुक्यातील पंचायतराज चषक क्रिकेट स्पर्धेदरम्यान एका ३५ वर्षीय खेळाडूचा मैदानावरच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. सोमनाथ चंद्रभान बहादुरे (वय 35, रा. लहानेची वाडी, ता. फुलंब्री, ह.मु. भोकरदन) असे या अपघाती मृत्यू झालेल्या खेळाडूचे नाव आहे. विशेष म्हणजे सोमवारी त्यांच्या एक वर्षाच्या मुलीचा वाढदिवस होता, त्यामुळे कुटुंबासाठी हा दुहेरी आघात ठरला आहे.
advertisement
13 जूनपासून तालुका क्रीडा संकुल, भोकरदन येथे सुरू असलेल्या पंचायतराज चषकात सोमवारी रात्री आठच्या सुमारास दोन संघांमध्ये रंगलेल्या सामन्यादरम्यान ही घटना घडली. सोमनाथ बहादुरे गोलंदाजी करत असताना अचानक मैदानावर कोसळले. ही घटना पाहून खेळाडू आणि प्रेक्षकांमध्ये एकच खळबळ उडाली. सहकाऱ्यांनी आणि आयोजकांनी तातडीने त्यांना भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात हलवले. मात्र, प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात नेण्यात आले, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
advertisement
सोमनाथ यांच्या पश्चात पत्नी, 5 वर्षांचा मुलगा आणि 1 वर्षाची मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, सहा महिन्यातील ही जालन्यातली दुसरी घटना आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात जालना शहरातील क्रिकेट स्पर्धेत विजय पटेल या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यावेळी विजय पटेल याचे वय अवघे 32 वर्ष होते. मैदानावरच विजयने अखेरचा श्वास घेतला होता.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Heart Attack : वाढदिवशीच लेकीवर आभाळ कोसळलं, क्रिकेटच्या मैदानात बापाला मृत्यूनं गाठलं
Next Article
advertisement
BMC Election : दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
  • शिवसेना ठाकरे गटात आणि शिंदे गटात काही जागांवर थेट लढत असणार आहे.

  • ठाकरेंना बालेकिल्ल्यात शह देण्यासाठी शिंदे गटाकडून आक्रमक डाव खेळला जात आहे.

  • ठाकरेंचा गेम करण्यासाठी शिंदे गटाने खेळी खेळली पण, त्यातच ते फसले आहेत.

View All
advertisement