धावत्या बसमध्ये महिलेने उचललं टोकाचं पाऊल, सगळे प्रवासी घाबरले,नेमकं काय घडलं?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेत एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेने टोकाचं पाऊल उचलल्याची घटना घडली आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar News : अविनाश कानडजे, प्रतिनिधी, (छत्रपती संभाजीनगर) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेत एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेने टोकाचं पाऊल उचलल्याची घटना घडली आहे. या महिलेने एसटी वेगात असताना बसमधून उडी घेतल्याची घटना घडली आहे. या घटनेत आता महिलेचा मृत्यू झाला आहे. कन्नड ते छत्रपती संभाजीनगर बसमध्ये हा प्रकार घडला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला ही राष्ट्रीय महामार्ग धुळे-सोलापूर रोडवर गल्लेबोरगाव येथून बसली होती.त्यानंतक काही अंतर प्रवास केल्यानंतर या महिलेने अचानक धावत्या बसमधून उडी घेतली होती. त्यानंतर महामार्गावर पडल्यानंतर मागून येणाऱ्या एका भरधाव गाडीच्या चाक त्यांच चाकं आलं होतं.त्यामुळे या घटनेत त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे.
advertisement
या घटनेची माहिती मिळताच खुलताबाद पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी महिलेच्या चेहऱ्यावरून चाक गेल्याने तिची ओळख पटवण्यात प्रचंड अडचणी येतायत. तसेच पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. तसेच पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.
advertisement
पोलिसांनी या प्रकरणी बसमधील काही प्रवाशांची देखील चौकशी केली. या चौकशीअंती महिला तणावात असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे या तणावातूनच महिलेने बसमधून उडी घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.आता या महिलेची ओळख पटवण्याचे आणि तिच्या आत्महत्येच कारण शोधण्याचे पोलिसांसमोर मोठं आव्हान असणार आहे. आता पोलीस या घटनेचा उलगडा किती दिवसात करतं हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
advertisement
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
October 29, 2025 6:27 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
धावत्या बसमध्ये महिलेने उचललं टोकाचं पाऊल, सगळे प्रवासी घाबरले,नेमकं काय घडलं?


