इंटरनॅशनल स्कूल नव्हे ही तर आपली झेडपीची शाळा, विद्यार्थ्यांचं थेट परदेशात कनेक्शन
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Vrushali Kedar
Last Updated:
विद्यार्थी दररोज 10 प्रश्न काढून आणतात आणि अॅलेक्साला ते प्रश्न विचारतात. यामुळे मुलांची इंग्रजी बोलण्याची शैली सुधारली असून त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.
अमरावती: सद्यस्थितीमध्ये जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेण्याकरिता अनेकजण नकार देतात. बहुतांशी पालक आपल्या पाल्यांसाठी प्रायव्हेट आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांना प्राधान्य देतात. प्रायव्हेट शाळांमध्ये मुलांचा सर्वांगिण विकास होतो आणि त्यांना आधुनिक जगाशी कनेक्ट केलं जातं. जिल्हा परिषदेच्या शाळा याबाबतीत फार मागास आहेत, असं अनेक पालकांचं म्हणणं आहे. पण, अमरावतीतील एका जिल्हा परिषद शाळेने हा समज खोटा ठरवला आहे. जिल्ह्यातील दाभा या गावातील 'पी. एम. श्री उच्च प्राथमिक शाळे'मध्ये अतिशय नाविण्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत. या शाळेतील विद्यार्थी ए. आर., व्ही. आर. आणि अॅलेक्सा डॉल तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत.
आयसीटीकॉर्नर अंतर्गत पहिला उपक्रम 'Talking With Alexa'
पी. एम. श्री उच्च प्राथमिक शाळेतील सहाय्यक शिक्षक अंकुश गावंडे यांनी लोकल18 शी संवाद साधला. ते म्हणाले, "मी वर्ग खोलीमध्ये आयसीटी कॉर्नर तयार केला आहे. त्या अंतर्गत मी विविध उपक्रम राबवत असतो. त्यातील सर्वात महत्वाचा उपक्रम म्हणजे 'Talking With Alexa'. मी अॅलेक्सा हे गॅझेट आणून त्याला एक डॉल अॅटॅच केली. विद्यार्थी दररोज 10 प्रश्न काढून आणतात आणि अॅलेक्साला ते प्रश्न विचारतात. यामुळे मुलांची इंग्रजी बोलण्याची शैली सुधारली असून त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे."
advertisement
आयसीटीकॉर्नर अंतर्गत दुसरा उपक्रम 'ए. आर आणि व्ही. आर.'
या उपक्रमात विद्यार्थ्यांना व्हर्च्युअल रिअॅलिटीसारखी संकल्पना शिकवली जाते. ए. आरमध्ये विद्यार्थी एखाद्या विशिष्ट अॅपद्वारे चित्र स्कॅन करून माहिती मिळवतात. तसेच व्ही. आरच्या माध्यमातून म्युझियम, सूर्यमालेसारख्या गोष्टी अनुभवण्याचा प्रयत्न करतात. ग्रामीण भागातील विद्यार्थी पैसे खर्च करून मोठमोठ्या शहरात जाऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यासाठी अशी गॅजेट्स खूप महत्वाची ठरत आहेत.
advertisement
वर्ल्ड वाईड ग्रीन प्रोजेक्ट
या उपक्रमाच्या माध्यमातून विविध देशातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला जातो आणि माहितीची देवाणघेवाण केली जाते. याबाबत बोलताना अंकुश गावंडे म्हणाले, "एज्युकेशन कल्चर एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत माझ्या शाळेतील विद्यार्थी दुसऱ्या देशातील विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. त्यांच्याकडून अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात. यामुळे विचारांची आणि अभ्यासक्रमाची देवाणघेवाण होते. शिवाय विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास देखील वाढतो. शाळेतील संपूर्ण स्टाफ मला या कामात मदत करतो. माझ्या या उपक्रमांची दखल शिक्षण मंत्री, जिल्हाधिकारी यांनी सुद्धा घेतली आहे."
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
Aug 12, 2025 12:46 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
इंटरनॅशनल स्कूल नव्हे ही तर आपली झेडपीची शाळा, विद्यार्थ्यांचं थेट परदेशात कनेक्शन







