मुंबई-नागपूर महामार्गावर इको कारचा भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
मुंबई-नागपूर महामार्ग 53 वर रणथम गावाजवळ इको कारच्या अपघातात चार जणांचा मृत्यू, 5 जण गंभीर जखमी. पोलिस तपास सुरू असून परिसरात शोककळा पसरली.
मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर मलकापूर तालुक्यातील रणथम गावाजवळ एक भीषण अपघात झाला. एका इको कारने अज्ञात वाहनाला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला, ज्यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून, 5 जण गंभीर जखमी आहेत. हा अपघात नेमका कसा झाला याबाबत सध्या कोणतीही माहिती मिळू शकली नाही. अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी तातडीनं जखमींना मलकापूर इथे उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. या अपघातामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती, ज्यामुळे दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलीस सध्या अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, या अपघाताचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
advertisement
अपघात नेमका कसा झाला? चालकाला डुलकी लागली होती का? गाडीचे ब्रेक फेल झाले की वेग याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या अपघातात इको कारचं मोठं नुकसान झालं. इकोमध्ये बसलेल्या चार जणांचा जागीच मृत्यू झाला.
Location :
Nagpur,Nagpur,Maharashtra
First Published :
September 18, 2025 10:32 AM IST