शेतकऱ्यांना आधी पावसानं झोडलं आता हिवाळ्यात मोठं संकट, हवामान विभागाने दिली मोठी अपडेट

Last Updated:

Agriculture Weather : रब्बी हंगामात थंडीचे महत्त्व असते; मात्र अत्यंत थंडी पिकांसाठी धोकादायक ठरू शकते. यंदा ‘ला निना’ परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने असामान्य थंडीचा फटका रब्बी पिकांना बसू शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

Maharashtra weather update
Maharashtra weather update
मुंबई : रब्बी हंगामात थंडीचे महत्त्व असते; मात्र अत्यंत थंडी पिकांसाठी धोकादायक ठरू शकते. यंदा ‘ला निना’ परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने असामान्य थंडीचा फटका रब्बी पिकांना बसू शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) यांनी यावर सखोल अभ्यास सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
‘ला निना’ म्हणजे काय?
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) मते, ‘ला निना’ म्हणजे विषुववृत्ताजवळील प्रशांत महासागरात समुद्राच्या पाण्याचे तापमान सामान्यपेक्षा थंड होणे. या प्रक्रियेचा थेट परिणाम जागतिक हवामान पद्धतींवर होतो. भारतात ‘ला निनासामान्यतः अधिक थंड हिवाळ्याशी जोडला जातो. ही घटना ‘एल निनो-सदर्न ऑस्सिलेशन’ (ENSO) चक्राचा एक महत्त्वाचा भाग आहे.
advertisement
रब्बी पिकांसाठी थंडीचे आव्हान
भारताच्या एकूण धान्य उत्पादनात गहू आणि कडधान्यांचा हिस्सा जवळपास ४५ टक्के आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील हवामानातील बदलांचा देशाच्या अन्नसुरक्षेवर मोठा परिणाम होतो.
“या वर्षी सरासरीपेक्षा अधिक थंडीची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचा गहू, कडधान्ये, तेलबिया आणि इतर रब्बी पिकांवर नेमका कसा परिणाम होतो, हे समजून घेण्यासाठी विविध राज्यांमध्ये अभ्यास केला जाणार आहे,” असे ICARचे महासंचालक डॉ. मांगीलाल जाट यांनी सांगितले.
advertisement
रब्बी हंगामाचे महत्त्व
ऑक्टोबर ते एप्रिल या कालावधीत रब्बी पिकांचा हंगाम चालतो. पेरणी ऑक्टोबर-डिसेंबरदरम्यान केली जाते, तर कापणी मार्च-एप्रिलमध्ये होते. गहू, हरभरा, मोहरी, जव, मसूर आणि काही ठिकाणी भात हे या हंगामातील प्रमुख पिके आहेत.
२०२४-२५ मध्ये जवळपास ६६.१ दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिके पेरली गेली होती. हा हंगाम देशातील अन्नधान्य पुरवठ्यासोबतच कृषी उद्योगांना देखील चालना देतो.
advertisement
संभाव्य धोके आणि संधी
‘ला निना’ परिस्थितीमुळे काही भागांत थंडी वाढून जमिनीत ओलावा टिकून राहतो, ज्याचा फायदा गव्हासारख्या पिकांना होतो. परंतु मैदानी प्रदेशांमध्ये जर जास्त पाऊस झाला तर पाणी साचून पिकांचे नुकसान होऊ शकते. यामुळे कापणी उशिरा होणे किंवा उत्पादनात घट येणे अशा समस्या उद्भवतात. विशेषतः पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील पिकांना याचा जास्त फटका बसतो, असे कृषी विज्ञान केंद्राच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
advertisement
भूतकाळातील अनुभव
भारतात २०२०-२१ आणि २०२१-२२ मध्ये देखील ‘ला निना’ स्थिती अनुभवायला मिळाली होती. मात्र यामुळे नेमका किती तोटा झाला याचे अचूक मोजमाप करणे कठीण आहे. कारण पीक उत्पादकता ही हवामानाबरोबरच पाणी, माती, बियाण्यांची गुणवत्ता, तंत्रज्ञानाचा वापर अशा अनेक घटकांवर अवलंबून असते.
पुढील अंदाज
advertisement
हवामान विभागाच्या मते, ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीत ‘ला निना’ परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. “या तीन महिन्यांचा तपशीलवार अंदाज ३० सप्टेंबर किंवा १ ऑक्टोबरला जाहीर केला जाईल,” असे IMDचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले.
यंदाच्या हिवाळ्यातील असामान्य थंडीने रब्बी पिकांच्या उत्पादनावर सकारात्मक की नकारात्मक परिणाम होणार, हे अभ्यासानंतरच स्पष्ट होईल. मात्र शेतकरी आणि धोरणकर्त्यांसाठी हा अंदाज अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
मराठी बातम्या/कृषी/
शेतकऱ्यांना आधी पावसानं झोडलं आता हिवाळ्यात मोठं संकट, हवामान विभागाने दिली मोठी अपडेट
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement