Shocking News : झोपेत असतानाच साधला डाव; घराच्या बाल्कनीतू आला अन्...;कल्याण परिसर हादरला
Last Updated:
kalyan East Theft News : कल्याण पूर्वेकडील हरिश्चंद्र कॉलनीत उघड्या बाल्कनीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी घरात प्रवेश करून रोख रक्कम आणि चांदीची मूर्ती चोरून नेली. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांत गुन्हा दाखल आहे.
कल्याण : कल्याण पूर्वेकडील हरिश्चंद्र कॉलनी परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. येथील रहिवासी प्रांजल चव्हाण यांच्या घरात चोरट्यांनी बाल्कनीच्या उघड्या दरवाजाचा गैरफायदा घेत चोरी केली. ही घटना अलीकडेच घडली असून यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
उघड्या बाल्कनीतून थेट घरात शिरला
मिळालेल्या माहितीनुसार, प्रांजल चव्हाण हे आपल्या कुटुंबासह घरी असतानाच ही घटना घडली. घराच्या बाल्कनीचा दरवाजा उघडा असल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी संधी साधत घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील कपाटात ठेवलेली 13 हजार 500 रुपयांची रोख रक्कम तसेच सुमारे एक हजार रुपये किमतीची चांदीची मूर्ती चोरून नेली.
चोरी झाल्याचे लक्षात येताच प्रांजल चव्हाण यांनी तात्काळ कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी करण्यात येत असून संशयितांचा शोध घेतला जात आहे.
advertisement
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. उघड्या बाल्कनी, खिडक्या आणि दरवाजांमुळे चोरट्यांना सहज संधी मिळत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पोलिसांनी नागरिकांना घराची योग्य काळजी घेण्याचे तसेच रात्रीच्या वेळी दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 12, 2026 11:56 AM IST
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Shocking News : झोपेत असतानाच साधला डाव; घराच्या बाल्कनीतू आला अन्...;कल्याण परिसर हादरला










