ICICI क्रेडिट कार्ड यूझर्सला धक्का! 15 जानेवारीपासून बदलतील हे नियम, खिशावर होईल परिणाम
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
ICICI बँकेने Emeralde Metal Card सह अनेक क्रेडिट कार्डचे रिवॉर्ड्स, चार्जेस आणि बेनिफिट्समध्ये बदल केले आहेत. जे 15 जानेवारी 2026 पासून लागू होतील. खर्च आणि फायद्यावर परिणाम होईल. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेचा खिशावर पडेल. आयसीआयसीआय बँकेपूर्वीच एसबीआयने आपल्या एटीएम चार्जमध्ये मोठे बदल केले होते. ICICI बँकेचे हे खास दबल निवडक क्रेडिट कार्डवर लागू होतील. सोबतच बँकांनी काही प्रकारचे ट्रांझेक्शनवर नवीन चार्जही लावले आहेत.
ICICI Bank Credit Card Charges: नवीन वर्षाची सुरुवात होताच अनेक आर्थिक बदल पाहायला मिळत आहेत. एसबीआयने नुकतेच एटीएम ट्रांझेक्शन चार्जमध्ये बदल केले आहेत. आता आयसीआयसीआय बँकेने आपल्या काही क्रेडिट कार्ड्सच्या नियमांमध्ये बदलांची घोषणा केली आहे. ज्यामुळे रिवॉर्ड्स, बेनिफिट्स आणि काही चार्जेसवर परिणाम होईल. हे बदल विशेषतः निवडक क्रेडिट कार्ड्सवर लागू होतील. सोबतच बँकेने काही प्रकारच्या ट्रांझेक्शनवर नवीन चार्जही लावले आहेत.
advertisement
advertisement
रिवॉर्ड पॉइंट्समध्ये बदल : ICICI बँक Emeralde Metal Card होल्डर्सनी त्यांच्या रिवॉर्ड पॉइंट्समध्ये बदल केले आहेत. किरकोळ खर्चावर पूर्वीप्रमाणेच प्रति ₹200 वर 6 रिवॉर्ड पॉइंट्स मिळत राहतील. तसंच, हा फायदा सरकारी सर्व्हिस, इंधन, भाडे, कर, प्रॉपर्टी मॅनेजमेंट आणि थर्ड-पार्टी वॉलेटवर उपलब्ध राहणार नाही.
advertisement
advertisement
advertisement
परदेशी करेंसीमध्ये खर्च : याव्यतिरिक्त, Times Black ICICI Cardवर 1.49% करेन्सी कन्व्हर्जन फीस लागेल, एमराल्ड / एमराल्ड मेटल / एमराल्ड प्रायव्हेट कार्डवर 2% शुल्क, मेकमायट्रिप आयसीआयसीआय ट्रॅव्हल कार्डवर 0.99%% शुल्क, अमेझॉन पे आयसीआयसीआय कार्डवर 1.99% शुल्क आणि इतर कार्डांवर 3.5%% फीस आकारली जाईल.
advertisement
advertisement
थर्ड-पार्टी वॉलेटमध्ये पैसे जमा करण्यासाठी फीस : अमेझॉन पे, पेटीएम आणि मोबिक्विक सारख्या मनी वॉलेट अ‍ॅप्समध्ये ₹5,000 किंवा त्याहून अधिक रक्कम लोड केल्यास 1% शुल्क आकारले जाईल. शिवाय, शाखांमध्ये रोख पेमेंट अधिक महाग होईल. क्रेडिट कार्ड बिलांसाठी शाखांमध्ये रोख पैसे भरण्याचे शुल्क ₹100 वरून ₹150 पर्यंत वाढेल. हे बदल जानेवारीमध्ये लागू होतील, म्हणून आयसीआयसीआय क्रेडिट कार्ड यूझर्सने त्यानुसार त्यांचे खर्च आणि फायद्याचे प्लॅनिंग करावेत.










