पालकांनो लक्ष द्या! 9 महिन्यांच्या बाळाला खोकला; तपासणीत फुफ्फुसात दिसलं असं काही की ससूनचे डॉक्टरही शॉक
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
लोणी येथील एका ९ महिन्यांच्या बालिकेला तीव्र खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. ससूनमध्ये तपासणी केली असता, तिच्या फुफ्फुसात शेंगदाणा अडकल्याचे समोर आले.
पुणे : पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टरांनी दोन चिमुकल्यांना मृत्यूच्या दारातून सुखरूप बाहेर काढले आहे. फुप्फुसात मणी आणि शेंगदाणा अडकल्यामुळे श्वास गुदमरणाऱ्या दोन बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी त्यांना जीवनदान दिले.
दौंड येथील एका १० महिन्यांच्या बालकाच्या फुप्फुसात प्लास्टिकचा मणी अडकला होता, ज्यामुळे त्याला श्वास घेणे कठीण झाले होते. दुसऱ्या घटनेत, लोणी येथील एका ९ महिन्यांच्या बालिकेला तीव्र खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. ससूनमध्ये तपासणी केली असता, तिच्या फुप्फुसात शेंगदाणा अडकल्याचे समोर आले. यापूर्वी खासगी रुग्णालयात या बालिकेच्या आजाराचे योग्य निदान होऊ शकले नव्हते.
advertisement
अत्याधुनिक तंत्रज्ञानाने शस्त्रक्रिया: दोन्ही बालकांची प्रकृती चिंताजनक असल्याने ससूनच्या कान, नाक व घसा (ENT) विभागाने तातडीने निर्णय घेतला. 'एंडोस्कोपिक ब्राँकोस्कोपी' या गुंतागुंतीच्या प्रक्रियेद्वारे आणि 'ऑप्टिकल फोर्सेप' या अत्याधुनिक यंत्राचा वापर करून फुप्फुसात अडकलेल्या वस्तू अत्यंत काळजीपूर्वक बाहेर काढण्यात आल्या. कोणतीही मोठी जखम न करता दुर्बिणीद्वारे ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली.
advertisement
डॉक्टरांच्या पथकाची कामगिरी: विभागप्रमुख डॉ. राहुल तेलंग यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. संजयकुमार सोनावले, डॉ. राहुल ठाकूर आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली. ससूनचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांनी या यशाबद्दल डॉक्टरांचे कौतुक केले आहे. डॉक्टरांनी या निमित्ताने पालकांना आवाहन केले आहे की, लहान मुले खेळताना तोंडात वस्तू घालतात, अशा वेळी पालकांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 12, 2026 11:49 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पालकांनो लक्ष द्या! 9 महिन्यांच्या बाळाला खोकला; तपासणीत फुफ्फुसात दिसलं असं काही की ससूनचे डॉक्टरही शॉक











