बाबांना 2-2 बायका, मला एकही नाही! लग्नासाठी आसुसलेला 35 वर्षांचा लेक, रागात वडिलांसोबत नको ते कृत्य
- Published by:Priya Lad
Last Updated:
Father Son Disputes : गावातील त्याचे समवयस्क विवाहित होते आणि त्यांना मुलं होती, तर तो स्वतः अविवाहित होता. त्याच्या वडिलांनी दोनदा लग्न केलं आहे पण ते त्याच्या भविष्याबद्दल गंभीर नव्हते याचा त्याला खूप राग होता.
मुलं वयात आली की पालक त्यांच्या लग्नाचा विचार करू लागतात. मुलांनाही त्यांच्या वयाच्या मुलांची लग्न झाली की आपलंही लग्न व्हावं असं वाटतं. असाच एक मुलगा ज्याच्या वयाच्या सगळ्या मुलांची लग्न झाली, पण तो एकटाच अविवाहित राहिला होता. आश्चर्य म्हणजे त्याच्या वडिलांची दोन लग्न झाली, त्यांनी 2 बायका केल्या पण मुलाचं मात्र एकही लग्न नाही. यामुळे मुलगा संतप्त झाला होता. रागात त्याने धक्कादायक पाऊल उचललं. वडिलांसोबतच नको ते कृत्य तो करून बसला.
कर्नाटकातील चित्रदुर्गमधील ही घटना. होसादुर्गा शहरात राहणारा 35 वर्षांचा एस. निंगाराजा जो शेतकरी आहे. त्याचे वडील टी. सन्नानिंगप्पा यांनी दोनदा लग्न केला. पण मुलगा निंगाराजाचं एकही लग्न झालं नव्हतं. गावातील त्याचे समवयस्क विवाहित होते आणि त्यांना मुलं होती, तर तो स्वतः अविवाहित होता. त्याच्या वडिलांनी दोनदा लग्न केलं आहे पण ते त्याच्या भविष्याबद्दल गंभीर नव्हते याचा त्याला खूप राग होता. हा राग हळूहळू रागात आणि नंतर हिंसाचारात बदलला.
advertisement
बुधवारी संध्याकाळी जेवणाच्या वेळी त्या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. निंगराजाने सन्नानिंगप्पालाही धमकीही दिली होती. त्या रात्री नंतर सन्नानिंगप्पा गाढ झोपेत असताना निंगाराजाने सन्नानिंगप्पाच्या डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निंगाराजाने त्याच्या वडिलांवर लोखंडी रॉडने हल्ला केला, ज्यामुळे तो घटनास्थळी गंभीर जखमी झाला. त्याच्या कुटुंबाने त्याला ताबडतोब सरकारी रुग्णालयात नेले, जिथं डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
advertisement
आरोपीचा मोठा भाऊ एस. मारुतीने या हल्ल्याची पोलिसात तक्रार केली. मारुतीने पोलिसांना सांगितलं की, त्याचे वडील निंगाराजाची आळशी वृत्ती, तो शेतीत लक्ष देत नसल्याने अनेकदा फटकारायचे. यामुळे घरात सतत तणावाचं वातावरण होतं.
पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की ही घटना राग आणि दीर्घकाळ चाललेल्या तणावातून घडली आहे, पूर्वनियोजित कृत्य नाही. तरी या घटनेमागे इतर काही हेतू होते का हे निश्चित करण्यासाठी सर्व पैलू तपासले जात आहेत. आरोपी निंगाराजाला अटक करण्यात आली आहे. हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.
view commentsLocation :
Karnataka
First Published :
Jan 12, 2026 11:41 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
बाबांना 2-2 बायका, मला एकही नाही! लग्नासाठी आसुसलेला 35 वर्षांचा लेक, रागात वडिलांसोबत नको ते कृत्य











