Husband Wife : पोलीस अधिकाऱ्याशी लग्न, मूलही झालं; 7 वर्षांनी समजलं नवऱ्याचं असं सत्य, महिला धक्क्यात
- Published by:Priya Lad
Last Updated:
Couple Story : सुरुवातीला तो काही दिवस गायब व्हायचा, पण नंतर तो गेला तो कित्येक महिने घरी परतलाच नाही. 2017 साली तर तो पूर्णपणे गायबच झाला.
लव्ह मॅरेजमध्ये कपल आधीपासून एकमेकांना ओळखत असतात, पण अरेंज मॅरेजमध्ये लग्नानंतर हळूहळू गोष्टी उलगडत जातात. असंच अरेंज मॅरेज केलेली एक महिला जिला लग्नाच्या तब्बल 7 वर्षांनंतर तिच्या पतीचं असं सत्य समजलं की तिला मोठा धक्का बसला. नवऱ्याने बायकोला फसवलं होतं, तो तिच्याशी खोटं बोलला होता. कोर्टाने त्याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे.
चीनच्या हेबेई प्रांतातील ही घटना आहे. या महिलेचं 2014 साली लग्न झालं. जिया बिन असं तिच्या नवऱ्याचं नाव. तिच्या काकांनी तिचं लग्न लावून दिलं होतं. जियाने आपण पीपल्स आर्म पोलीसमध्ये अधिकारी असल्याचं सांगितलं होतं.
लग्नानंतर काही काळांनी त्यांना एक मुलगा झाला. पण जिया बहुतेक वेळा घराबाहेर असायचा. तो आपण खास कामावर असल्याचं सांगायचा. सुरुवातीला तो काही दिवस गायब व्हायचा, पण नंतर तो गेला तो कित्येक महिने घरी परतलाच नाही. 2017 साली तर तो पूर्णपणे गायबच झाला.
advertisement
महिला स्वत: सिंगल पॅरेटिंगमध्ये वाढली आहे. त्यामुळे आपल्या मुलाला आई आणि वडील दोघांचं प्रेम मिळावं असं तिला वाटत होतं. पण नवऱ्याशी संपर्क करण्याचा कोणताच मार्ग तिच्याकडे नव्हता. शेवटी 2020 साली तिने कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला तेव्हा जिया बिन नावाची कुणी व्यक्ती अस्तित्वातच नाही असं समजलं. लग्न झालं तेव्हा त्याने फक्त आर्मीचं सर्टिफिकेट दिलं होतं आणि त्याची फक्त बहीण लग्नाला होती. वडिलांचं निधन झाल्याचं खोटं सांगितलं.
advertisement
2021 साली पँगला एका तुरुंगातून फोन आला. तिच्या नवऱ्याचं नाव तू जिनी असल्याचं सांगण्यात आलं. त्याला आधीपासूनच एक पत्नी आणि मूल आहे, तो एका हत्येतील आरोपी असून त्याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आल्याची माहिती तिला देण्यात आली.
किमती वस्तू समोर होत्या, पण चोराने चोरली अशी वस्तू; दुकानदारही स्तब्ध, डोळ्यातून फक्त अश्रूच्या धारा
advertisement
2011 साली त्याने एका भांडणात एका पुरूषाची हत्या केली होती आणि नंतर दुसऱ्या शहरात पळून गेला होता. आपली ओळख लपवण्यासाठी तो पीएपी अधिकारी असल्याचं सांगून लोकांना फसवत होता. अशीच फसवणूक झालेल्या एका महिलेने त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आणि 2017 मध्ये पोलिसांनी त्याला अटक केली आणि मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली.
महिलेने सांगितलं की तिने जियाची कागदपत्रं कधीच पाहिली नाहीत कारण तिला भीती होती की जर ती आली तर तो रागावेल. तिने जियाने ज्या युनिटचा उल्लेख केला होता त्या युनिटशीही कधीही संपर्क साधला नाही. पण लग्नाच्या 7 वर्षांनंतर तिला त्याचं धक्कादायक सत्य समजलं. जियाने दिलेले लष्करी ओळखपत्र आणि युनिट प्रमाणपत्रे सर्व बनावट होती. तिने एका खुनीशी लग्न केलं आणि त्याच्या मुलाला जन्म दिला यामुळे तिला धक्का बसला. अखेर तिने त्याच्याशी घटस्फोट घेतला.
view commentsLocation :
Delhi
First Published :
Jan 12, 2026 9:08 AM IST
मराठी बातम्या/Viral/
Husband Wife : पोलीस अधिकाऱ्याशी लग्न, मूलही झालं; 7 वर्षांनी समजलं नवऱ्याचं असं सत्य, महिला धक्क्यात










