तो 53 वर्षांचा आणि ती 40 वर्षांची! वयात 13 वर्षे फरक, लिव्ह इनमध्ये राहत होतं कपल; दोघांचाही मृत्यू
- Published by:Priya Lad
Last Updated:
Live In Couple Death : त्यांनी एकत्र जेवण केलं आणि रात्री नऊच्या सुमारास निघून गेले. कोणालाही माहित नव्हतं की ही त्यांची शेवटची भेट असेल.
तामिळनाडूच्या तिरुवन्नमलाई जिल्ह्यातील चेंगमजवळील पक्कीरीपलयम या गावातील ही घटना आहे. 53 वर्षांचा पी. सक्तीवेल एक शेतकरी त्याचे 40 वर्षीय एस. अमृतमसोबत संबंध होते. दोघंही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. दोघंही एका झोपडीत एकत्र राहत होते. त्या दोघांचाही मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
सक्तीवेल 3 वर्षांपूर्वी त्याच्या पत्नीपासून वेगळा झाला होता. त्याला दोन मुलं आणि एक मुलगी आहे. ही तिन्ही मुलं त्यांच्या आईसोबत राहतात. अमृतमलाही तिच्या पतीपासून वेगळी झाली आहे, तिला तीन मुलं आहेत. गेल्या तीन वर्षांपासून हे कपल गावाबाहेरील शेतात एका छोट्या झोपडीत एकत्र राहत होतं. एकमेकांचा आधारस्तंभ होतं.
advertisement
गुरुवारी रात्री सक्तीवेलची मुलगी त्याला भेटायला आली. त्यांनी एकत्र जेवण केलं आणि रात्री नऊच्या सुमारास निघून गेले. कोणालाही माहित नव्हतं की ही त्यांची शेवटची भेट असेल. रात्रीच्या शांततेत कोणीतरी झोपडीचा दरवाजा बाहेरून बंद केला आणि आग लावली. दोघांना ओरडून आपला जीव वाचवण्याची संधीही मिळाली नाही.
शक्तीवेल आणि अमृतम यांचा झोपडीला लागलेल्या आगीत मृत्यू झाला. चेंगम पोलिसांनी दोघांच्याही मृत्यूला संशयास्पद मानून गुन्हा दाखल केला आहे. पोलीस त्यांच्या मागील नातेसंबंधांच्या भूमिकेसह प्रत्येक पैलूचा तपास करत आहेत. ही घटना केवळ दोन लोकांची हत्या नाही तर अशा समाजासाठी एक प्रश्न आहे जिथं नातेसंबंध तुटल्यानंतर नवीन जीवन सुरू करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना इतक्या क्रूरपणे गप्प केलं जातं.
advertisement
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, शुक्रवारी सकाळी गावकऱ्यांना काहीतरी जळल्याचा वास आला तेव्हा सगळे उठले. त्यांनी शेताच्या दिशेने धाव घेतली, तेव्हा त्यांना एक लहान झोपडी पूर्णपणे जळून खाक झालेली आढळली. माहिती मिळताच चेंगम पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृतदेह इतके जळाले होते की ओळख पटवणं कठीण झालं होतं. फॉरेन्सिक टीमला बोलावलं, स्निफर डॉगचा वापर करण्यात आला आणि घटनास्थळी पोस्टमॉर्टेम करण्यात आलं.
view commentsLocation :
Tamil Nadu
First Published :
Jan 11, 2026 8:08 AM IST
मराठी बातम्या/देश/
तो 53 वर्षांचा आणि ती 40 वर्षांची! वयात 13 वर्षे फरक, लिव्ह इनमध्ये राहत होतं कपल; दोघांचाही मृत्यू










