Satara Crime: 'मीच बायकोला मारलं', संशयाचं भूत डोक्यात शिरलं, पतीने पत्नीला घरातच संपवलं, खून बघून पोलिसही हादरले!

Last Updated:

Satara Crime : बुधवारी दुपारी एकच्या सुमारास विनोद जाधव स्वतःहून पोलीस ठाण्यात आला. "मी पत्नीचा चारित्र्याच्या संशयावरून...

Satara Crime
Satara Crime
Satara Crime : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी गज मारून तिचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना खटाव तालुक्यातील कटगुण येथील गोसावी वस्तीवर घडली आहे. या घटनेनंतर आरोपी पतीने स्वतःच पुसेगाव पोलीस ठाण्यात हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिली.
विनोद विजय जाधव (वय-26) असे आरोपी पतीचे नाव असून, त्याच्या हल्ल्यात पिंकी विनोद जाधव (वय-21) या पत्नीचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी एकच्या सुमारास विनोद जाधव स्वतःहून पोलीस ठाण्यात आला. "मी पत्नीचा चारित्र्याच्या संशयावरून लोखंडी गजाने खून केला आहे, तिचा मृतदेह घरात रक्ताच्या थारोळ्यात पडला आहे," असे त्याने पोलिसांना सांगितले.
advertisement
घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक संदीप पोमण तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांना पिंकी जाधव रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. नातेवाईकांच्या मदतीने पोलिसांनी तिला पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
पिंकीला तीन लहान मुले आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे कटगुणसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आरोपी पती विनोद जाधव याच्याविरुद्ध पुसेगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
advertisement
मराठी बातम्या/क्राइम/
Satara Crime: 'मीच बायकोला मारलं', संशयाचं भूत डोक्यात शिरलं, पतीने पत्नीला घरातच संपवलं, खून बघून पोलिसही हादरले!
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement