advertisement

अल्पवयीन मुलीचं जबरदस्तीने लग्न, पण आईचंच जावयासोबत... बीडमध्ये 4 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं?

Last Updated:

Beed Crime News : बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने तिच्या आई आणि नातेवाईकांनी तिचे जबरदस्तीने लग्न लावून दिले, तसेच पतीने शारीरिक आणि...

Beed Crime News
Beed Crime News
Beed Crime News : बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने तिच्या आई आणि नातेवाईकांनी तिचे जबरदस्तीने लग्न लावून दिले, तसेच पतीने शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप करत धारूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, आपल्या आईचेच पतीसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोपही पीडितेने केला आहे.
लग्नासाठी बळजबरी
पीडित मुलगी आपल्या आई आणि दोन लहान बहिणींसोबत राहत होती. 2017 मध्ये ती सातवीत असताना, तिच्या आईने गावातील एका तरुणासोबत तिचे धारूर येथील एका मंदिरात जबरदस्तीने लग्न लावून दिले. लग्नाला आपली इच्छा नसतानाही आई, सासू, मावशी, चुलत दीर, चुलत सासरा आणि चुलत सासू यांनी तिला लग्नासाठी बळजबरी केली. त्यानंतर तिला सासरी पाठवण्यात आले. तिथे पतीने तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. तिने याबद्दल आई आणि सासूला सांगितले असता, त्यांनी तिलाच गप्प बसण्यासाठी धमकावले.
advertisement
आई आणि पतीचे संबंध
याच काळात पीडितेने आपल्या आईचे पतीसोबत अनैतिक संबंध असल्याचे पाहिले. यामुळे तिला मानसिक त्रास होऊ लागला. ‘तू आम्हाला बदनाम करतेस’ असे बोलून तिचा छळ करण्यात आला. हा त्रास असह्य झाल्याने ती मार्च 2022 मध्ये आजी-आजोबांकडे गेली. पण तिथेही आई आणि पती पोहोचले.
पीडितेला दिलासा
या छळातून सुटका व्हावी म्हणून पीडिता 17 एप्रिल 2022 रोजी अंबाजोगाई येथील 'मानवलोक सेवाभावी संस्थे'त गेली. तेथील अधिकारी अरुंधती पाटील यांना तिने सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर संस्थेतील अश्विनी जगताप यांनी तिला बीड येथील बाल कल्याण समितीसमोर हजर केले. समितीच्या आदेशानुसार ती आता अंबाजोगाई येथील सावित्रीबाई फुले मुलींच्या बालगृहात राहत आहे. ऑगस्ट 2025 मध्ये बाल न्याय मंडळाच्या अध्यक्षांनी भेट दिल्यावर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आणि चार वर्षांनंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. बीडमधील बाल कल्याण समितीचे अध्यक्ष अशोक तांगडे, सदस्य संतोष वारे, सुरेश राजहंस आणि छाया गडगे यांनी पीडितेला धीर दिला आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
अल्पवयीन मुलीचं जबरदस्तीने लग्न, पण आईचंच जावयासोबत... बीडमध्ये 4 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं?
Next Article
advertisement
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात; बारामतीच्या रनवेवर त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात
  • बारामती अपघात हा शेवटचा इशारा

  • विमान वाहतूक सुरक्षेचे 'ऑडिट' आता तरी होणार का?

  • अजित पवारांचा अंत आणि उडालेली सुरक्षा यंत्रणा

View All
advertisement