Kolhapur Politics : कोल्हापूर मनपाच्या 'वॉर्डात' पुन्हा उत्साह; पण इच्छुकांच्या मनात आजही धास्ती, पण कसली? 

Last Updated:

Kolhapur Politics : गेल्या साडेचार वर्षांपासून रखडलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची तारीख सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केल्याने इच्छुकांमध्ये...

Kolhapur Politics
Kolhapur Politics
Kolhapur Politics : गेल्या साडेचार वर्षांपासून रखडलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची तारीख सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केल्याने इच्छुकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, प्रत्येक वेळी निवडणूक पुढे ढकलली गेल्याचा अनुभव लक्षात घेता, पुन्हा या निवडणुका पुढे ढकलणार तर नाही ना, अशी भीती इच्छुकांच्या मनात आहे.
वारंवार प्रयत्न, पण निराशाच
नोव्हेंबर 2020 मध्ये कोल्हापूर मनपाच्या सभागृहाची मुदत संपली. त्यानंतर आतापर्यंत तीन वेळा प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली आणि दोन वेळा आरक्षणही जाहीर झाले. प्रत्येक वेळी इच्छुकांनी निवडणुकीची जोरदार तयारी केली, वेळ आणि पैसा खर्च केला, पण कोरोना महामारी आणि आरक्षण यांसारख्या मुद्द्यांमुळे निवडणूक पुढे ढकलली गेली. यामुळे, प्रत्यक्ष मैदानात उतरण्याची संधीच न मिळाल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला.
advertisement
सर्वोच्च न्यायालयाचा आदेश 
आता सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. सोशल मीडियावर या निर्णयाचे स्वागत होत असले, तरी मागील अनुभव पाहता, खरोखरच निवडणुका होतील का, याबाबत इच्छुकांच्या मनात धास्ती आहे. ‘आता किती वेळा तयारी करून श्रम, वेळ आणि पैसा वाया घालवायचा?’ असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.
advertisement
राजकीय नेत्यांचे म्हणणे 
स्थानिक नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले असून, राज्य सरकारने या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली आहे. या निर्णयामुळे कोल्हापूर मनपाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्याची आशा पुन्हा एकदा निर्माण झाली आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/Politics/
Kolhapur Politics : कोल्हापूर मनपाच्या 'वॉर्डात' पुन्हा उत्साह; पण इच्छुकांच्या मनात आजही धास्ती, पण कसली? 
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement