Kiran Mane : अभिनेते किरण मानेंचा ठाकरे गटात प्रवेश; मशाल हाती घेताच सांगितलं कारण

Last Updated:

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेशानंतर बोलताना त्यांनी राजकारणात येण्यामागचं आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत येण्याचं कारणही सांगितलं.

News18
News18
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आज अनेकांनी पक्ष प्रवेश केला. बीडच्या काही कार्यकर्त्यांसह अभिनेते किरण माने यांनी शिवबंधन हाती बांधलं. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, ही लढाई फक्त राजकारणासाठी नाही तर महाराष्ट्रावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आहे. तर किरण माने यांनी सांगितलं की, मी सामान्य कलाकार असून मला जी जबाबदारी मिळेल ती पूर्णपणे पार पाडेन.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेशानंतर बोलताना त्यांनी राजकारणात येण्यामागचं आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत येण्याचं कारणही सांगितलं. किरण माने म्हणाले की, मी एक सामान्य कलाकार आहे. परिवर्तनाच्या चळवळीत काम करणारा माणूस आहे. मी राजकीय भूमिका का घेतली असा प्रश्न विचारला जातोय. तर सध्या संविधान वाचवण्याची आणि लोकशाही वाचवण्याची ताकद उद्धव ठाकरे यांच्यात आहे. पक्षात मला जी जबाबदारी मिळेल ती मनापासून पार पाडेन असंही किरण माने यांनी यावेळी म्हटलं.
advertisement
ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर लिहिली होती पोस्ट
शिंदे गटाने बंड केल्यानंतर जेव्हा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला तेव्हा किरण माने यांनी एक पोस्ट लिहिली होती. त्यात त्यांनी म्हटलं होतं की, एकाही नेत्याकडं नसल अशी गोष्ट तुमच्याकडं आहे ती म्हणजे तुमचे निष्ठावान कार्यकर्ते. गाळ बाजूला गेला आणि आता शंभर टक्के प्युअर असलेला माणूस तुमच्यासोबत आहे. तुम्हाला राखेतून झेप घ्यायचीय.
advertisement
अभिनेते किरण माने आतापर्यंत अनेक कारणांनी चर्चेत आले आहेत. मराठी टीव्ही मालिकेतील कलाकारांसोबत गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून मालिकेतून काढून टाकलं होतं. यावेळी त्यांना काही कलाकारांनी पाठिंबाही दिला होता. दरम्यान, किरण माने यांनी सोशल मीडियावर आपण मांडत असलेल्या भूमिकेमुळे आपल्याला मालिकेतून काढून टाकलं असा प्रत्यारोप केला होता.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Kiran Mane : अभिनेते किरण मानेंचा ठाकरे गटात प्रवेश; मशाल हाती घेताच सांगितलं कारण
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement