म्हणे नाशिक कायद्याचा किल्ला! मालेगाव, मनमाडनंतर सटाण्यात 9 वर्षांच्या चिमुरडीचे लचके तोडले!

Last Updated:

सध्या नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात लहानं मुलं, मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या घटना वारंवार घडत असल्याचं समोर येत आहे. 

(प्रतिकात्मक फोटो)
(प्रतिकात्मक फोटो)
सटाणा : नाशिक जिल्ह्यातील मालेगावमधील डोंगराळे गावात एका ३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणामुळे अवघ्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. ही घडून काही दिवस होत नाही पुन्हा एकदा मनमाडमध्ये एका चिमुरडीवर अत्याचाराची घटना समोर आली. त्यानंतर आता सटाण्यामध्ये एका ९ वर्षांच्या चिमुरडीवर ७५ वर्षांच्या नराधमाने अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी या नराधमाला अटक केली आहे.
सध्या नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात लहानं मुलं, मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या घटना वारंवार घडत असल्याचं समोर येत आहे.  मालेगावला दोन आणि मनमाडला एक घडलेली घटना ताजी असताना आज सटाणा इथं एका 9 वर्षीय बालिकेवर 75 वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
advertisement
नामदेव गुंजाळ असं या नराधम आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या आरोपीविरोधात  बाल अत्याचार आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच संतप्त नागरिकांनी पोलीस स्टेशन मध्ये गर्दी करून आरोपीला कडक शिक्षा करण्याची मागणी केली.
मनमाड शहरात अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार
तर, मालेगाव पाठोपाठ आता मनमाड शहरात ही अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.  या प्रकरणी पोलिसांनी 64 वर्षीय बाबा भागवत नावाच्या आरोपीला अटक केली आहे.  त्याच्या विरुद्ध ऍट्रॉसिटी आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या नराधमाने एका 7 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार केला. शिवाय शहरातील एका भागात असलेली लॉन्ड्रीच्या दुकानात प्रेस करण्यासाठी कपडे घेऊन येणाऱ्या लहान मुलांशी अश्लील चाळे करून लैंगिक अत्याचार करीत असल्याचे डिवायएसपी बाजीराव महाजन यांनी सांगितलं.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
म्हणे नाशिक कायद्याचा किल्ला! मालेगाव, मनमाडनंतर सटाण्यात 9 वर्षांच्या चिमुरडीचे लचके तोडले!
Next Article
advertisement
Eknath Shinde : ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली 'सिक्रेट' बैठक, कोणाला दिलं आमंत्रण?
ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, शिंदेंनी बोलावली 'सिक्रेट' बैठक, कोणाल
  • ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली सिक्रेट बैठक, क

  • ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली सिक्रेट बैठक, क

  • ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली सिक्रेट बैठक, क

View All
advertisement