Ahilya Nagar : काँग्रेस जिल्हाध्यक्ष मारहाण प्रकरणात मोठी अपडेट, हल्लेखोरांचा व्हिडीओ समोर, ''आम्ही कोणाचंही...''
- Published by:Shrikant Bhosale
- Reported by:Harish Dimote
Last Updated:
Congress vs BJP : काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे अपहरण करून मारहाण केल्याची गंभीर घटना समोर आली. घटनेच्या काही तासामध्ये हल्लेखोरांनी व्हिडीओ प्रदर्शित करत मारहाण का केली, याचे कारण दिलं आहे.
अहिल्यानगर: नगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये आज सकाळी घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे अपहरण करून मारहाण केल्याची गंभीर घटना समोर आली. या घटनेनंतर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले. मात्र, घटनेच्या काही तासामध्ये हल्लेखोरांनी व्हिडीओ प्रदर्शित करत मारहाण का केली, याचे कारण दिलं आहे.
काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे अपहरण व मारहाण प्रकरणात एक महत्त्वाची कलाटणी आली आहे. जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांना मारहाण केल्याप्रकरणी संबंधितांचा नवा व्हिडिओ समोर आला आहे. या प्रकरणात शिवप्रेमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंदू आगे आणि त्यांच्या साथीदारांनी मारहाण केली असल्याचे समोर आले. आता, त्यावर स्वत: चंदू आगे याने व्हिडीओ द्वारे आपल्या कृत्याची कबुली दिली आहे.
advertisement
आज सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास सचिन गुजर मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. याच वेळी दोन व्यक्तींनी त्यांना जबरदस्तीने गाडीत घालून अपहरण केल्याचा आरोप आहे. काही तासांनंतर त्यांना मारहाण झालेल्या अवस्थेत सोडून दिल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फूटेज समोर आले.
हल्लेखोर चंदू आगेने काय म्हटले?
चंदू आगे याने म्हटले की, “आम्ही कोणाचंही अपहरण केलेलं नाही. कोणताही गुन्हा दाखल करा, पण आम्ही जामीन घेणार नसल्याचे म्हटले. काल रात्री एका प्रभागातील सभेत काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांनी भाषण करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप आगेने केला. याचा व्हिडिओ काही तासांतच सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर शिवप्रेमी म्हणून संताप आला. त्यानंतर आम्ही त्यांना मारहाण केली. मात्र, अपहरण केलं नसल्याचे आगे याने म्हटले.
advertisement
श्रीरामपूरचं वातावरण तापलं...
या सर्व प्रकरणामुळे श्रीरामपूरचे राजकीय वातावरण अक्षरशः तापले आहे. काँग्रेसने हा संपूर्ण प्रकार राजकीय सूडाचा असून नियोजनबद्ध हल्ला असल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे हिंदुत्ववादी कार्यकर्ते छत्रपतींचा अवमान केला गेला म्हणून प्रतिक्रिया दिली असा दावा करत आहेत. भाजप आणि महायुतीमधील इतर पक्षांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजरांविरोधात आत्मक्लेष आंदोलन सुरू केले आहे.
view commentsLocation :
Ahmadnagar (Ahmednagar),Ahmadnagar,Maharashtra
First Published :
November 26, 2025 2:44 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ahilya Nagar : काँग्रेस जिल्हाध्यक्ष मारहाण प्रकरणात मोठी अपडेट, हल्लेखोरांचा व्हिडीओ समोर, ''आम्ही कोणाचंही...''


