VC करायचा, कपडे काढायला लावायचा, NCPच्या नेत्यावर 25 वर्षीय तरुणीचा गंभीर आरोप, नगरसह पुण्यातील लॉजवर वारंवार अत्याचार
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
अहिल्यानगर शहराचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्याविरोधात एका २५ वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याचा गंभीर गुन्हा दाखल झाला आहे.
अहिल्यानगर शहराचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्याविरोधात एका २५ वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याचा गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. कळमकर यांनी अहिल्यानगर शहरासह पुणे जिल्ह्यातील शिरूर याठिकाणी लॉजवर नेऊन अत्याचार केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
नेमका आरोप काय?
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणीला शाळेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून कळमकर यांनी तिच्याशी संपर्क वाढवला. नोकरीच्या देण्याच्या बहाण्याने कळमकर यांनी पीडितेला अहिल्यानगर शहरातील विविध ठिकाणी आणि पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील एका लॉजवर नेऊन तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार केले. हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही, तर कळमकर हे तरुणीला मोबाईलवर व्हिडिओ कॉल करून कपडे काढण्यास भाग पाडत असत आणि तासनतास मानसिक त्रास देत असत, असा गंभीर आरोपही पीडितेनं तक्रारीत केला आहे. याबाबत कळमकरांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न न्यूज १८ मराठीनं केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
advertisement
ब्लॅकमेलिंग आणि व्हिडिओ पुरावे
पीडितेनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, अत्याचार करत असतानाचे व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल केलं जात होतं. या सततच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून अखेर तरुणीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. विशेष म्हणजे, या प्रकरणाशी संबंधित काही व्हिडिओ पुरावे देखील पीडितेने पोलिसांकडे सुपूर्द केल्याचं समजतं.
advertisement
अभिषेक कळमकर फरार; पोलिसांचा शोध सुरू
गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच माजी महापौर अभिषेक कळमकर हे फरार झाले आहेत. पोलीस त्यांच्या शोधासाठी विविध ठिकाणी पथके रवाना करत आहेत. राजकीय पदावर असलेल्या व्यक्तीवर अशा प्रकारचे गंभीर आरोप झाल्याने नगर शहरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.
Location :
Ahmadnagar (Ahmednagar),Ahmadnagar,Maharashtra
First Published :
Feb 21, 2026 1:11 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
VC करायचा, कपडे काढायला लावायचा, NCPच्या नेत्यावर 25 वर्षीय तरुणीचा गंभीर आरोप, नगरसह पुण्यातील लॉजवर वारंवार अत्याचार







