कीर्तनाच्या कार्यक्रमात तुफान राडा, महाराजांना धक्काबुकीचा प्रयत्न, आठ ते दहा जणांवर गुन्हा दाखल

Last Updated:

संगमनेर शहराजवळील घुलेवाडी गावातील कीर्तनाच्या कार्यक्रमात मोठा गोंधळ उडाल्याची घटना घडली आहे. या गोंधळात राजगुरुनगर येथील संग्राम महाराज भंडारे यांना धक्काबुक्की केल्याचाही प्रकार घडला आहे.

ahilyanagar news
ahilyanagar news
Ahilyangar News : संगमनेर शहराजवळील घुलेवाडी गावातील कीर्तनाच्या कार्यक्रमात मोठा गोंधळ उडाल्याची घटना घडली आहे. या गोंधळात राजगुरुनगर येथील संग्राम महाराज भंडारे यांना धक्काबुक्की केल्याचाही प्रकार घडला आहे. हिंदुत्वावर बोलत असल्याने हा प्रकार घडल्याची माहिती आहे. या घटनेनंतर संग्राम महाराज भंडारे यांनी कीर्तन अर्ध्यावर बंद पाडले होते.या प्रकरणी आता आठ ते दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास सूरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार संगमनेर शहराजवळील घुलेवाडी गावात हरिनाम सप्ताह निमित्ताने दररोज कीर्तन सूरू असते. यावेळी राजगुरुनगर येथील संग्राम महाराज भंडारे कीर्तनाला आले होते. सुरूवातीला त्यांनी भक्तीमय रूपात कीर्तन सूरू केले होते. पण त्यानंतर त्यांनी हिंदुत्वावर बोलायला सुरूवात केल्याचा आरोप आहे. त्यामुळे उपस्थितांपैकी काहींना त्यांचं हे बोलणं पटलं नाही. त्यामुळे त्यांनी महाराजांच कीर्तन रोखलं. इतक्यावरच ते थांबले नाही तर त्यांनी महाराजांना देखील धक्काबुक्की केली होती.त्यामुळे कीर्तनाच्या कार्यक्रमात मोठा राडा झाला होता. 16 ऑगस्टला उशिरा रात्री ही घटना घडली होती. या प्रकरणी आता गुन्हा दाखल झाल आहे.
advertisement
दरम्यान फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात लोकांनी चारचारी वाहनांचे देखील नुकसान केले होते. त्यामुळे चार जणांसह अज्ञात आठ जणांवर संगमनेर शहर पोलिस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा अधिकचा तपास पोलीस करीत आहेत.
कीर्तनकार संग्राम महाराज भंडारे यांनी तुकाराम महाराज यांच्या अभंगाने कीर्तनाला सुरूवात केली होती. मात्र सुरुवातीच्या अभंगानंतर महाराजांनी देशातील विविध घडामोडींवर भाष्य केले आणि हिंदुत्वावर भर द्यायला सुरुवात केली. उपस्थितांमध्ये बसलेल्या काही जणांना पटलं नाही आणि महाराज आणि त्यांच्यात वाद झाल्याची माहिती आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कीर्तनाच्या कार्यक्रमात तुफान राडा, महाराजांना धक्काबुकीचा प्रयत्न, आठ ते दहा जणांवर गुन्हा दाखल
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement