मुलीला मांडीवर चटके देणार गुंजाळ महाराज अट्टल रंगीला, तरुणींसोबत करायचा घाणेरडं कृत्य; कुंडली समोर
- Reported by:Sahebrao Kokane
- Published by:Prachi Amale
Last Updated:
एकीकडे कीर्तन आणि धार्मिक प्रवचन, तर दुसरीकडे क्रौर्याची परिसीमा ओलांडल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. ढवळपुरी येथील श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि कीर्तनकार यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ महाराज यांच्यावर 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर मागील पाच वर्षांपासून अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात अत्याचार आणि पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यापूर्वीही अत्याचाराचे दोन गुन्हे दाखल असून त्यामध्ये एका गुन्ह्यात तो निर्दोष सुटला आहे तर दुसरं गुन्ह्याचं प्रकरण न्यायालयात सुरू आहे
ढवळपुरी गावातील इयत्ता आठवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर कीर्तनकार यशवंत थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ यांनी धाक दाखवत वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे. नववीत शिक्षण घेत असताना आरोपीने जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले आणि हा प्रकार कुणाला सांगितल्यास कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. भीतीपोटी पीडित मुलीने अनेक वर्षे मौन बाळगले. मात्र 10 मार्च रोजी आरोपीने फोन करून घरी बोलावले असता तिने नकार दिल्याने संतप्त झालेल्या आरोपीने तिला मारहाण केली. तसेच स्वयंपाकघरातील लोखंडी पक्कड गॅसवर गरम करून तिच्या दोन्ही मांडींवर चटके दिल्याचा अमानुष प्रकार उघड झाला आहे.
advertisement
20 मार्चपर्यंत गुंजळेला पोलीस कोठडी
पीडितेवर जबरदस्ती करत पुन्हा धमक्या दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या घटनेनंतर पारनेर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत रविवारी पहाटे आरोपीला त्याच्या राहत्या घरातून अटक केली. न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपीला 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रणजित मारग करत आहेत. एकीकडे कीर्तन आणि धार्मिक प्रवचन, तर दुसरीकडे क्रौर्याची परिसीमा ओलांडल्याने परिसरात संतापाची लाट उसळली असून वारकरी संप्रदायाच्या प्रतिमेलाही मोठा धक्का बसल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
advertisement
अत्याचाराच्या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला
अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पोलिसांनीही यांच्या विरोधात काही तक्रारी असेल तर पारनेर पोलिसांची संपर्क साधा असे आव्हान केले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 16, 2026 3:13 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मुलीला मांडीवर चटके देणार गुंजाळ महाराज अट्टल रंगीला, तरुणींसोबत करायचा घाणेरडं कृत्य; कुंडली समोर








