'आय लव्ह मोहम्मद'चा वाद,रांगोळीवरून राडा, एकाला अटक, पोलिसांकडून महत्वाची माहिती
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
पोलिसांनी मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी एकाला अटक केली आहे. तर आंदोलन केल्या प्रकरणी 30 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिली आहे.
Ahilyanagar Protest : साहेबराव कोकणे,अहिल्यानगर : राज्याच 'आय लव्ह मोहम्मद'चा वाद सूरू झाला आहे. अहिल्यानगरमध्ये एका रांगोळीत 'आय लव्ह मोहम्मद' लिहल्यावरून मोठा वाद झाला आहे. यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या होत्या. त्यामुळे शहरातील कोटला स्टँड परिसरात रस्त्यावर अपमानास्पद मजकूर लिहिल्याच्या निषेधार्थ मुस्लीम समाज रस्त्यावर उतरला होता आणि आंदोलकांना बाजूला करण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज करावा लागला होता.या प्रकरणात आता पोलिसांनी मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी एकाला अटक केली आहे. तर आंदोलन केल्या प्रकरणी 30 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिली आहे.
अहिल्यानगरमध्ये नवरात्र उत्सवाचा कार्यक्रम सुरू आहे. हिंदू धर्माचा मोठा सण आहे,म्हणून दुर्गा मातेच्या पूजेसाठी काही लोकांनी रांगोळी काढली होती.त्या रांगोळी मध्ये काही समाज कंटकांनी 'आय लव्ह मोहम्मद' असं लिहिलं होतं यावरून हा वाद सुरू झाला होता. या 'आय लव्ह मोहम्मद' रांगोळी काढल्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या होत्या. तसेच शहरातील रस्त्यावर मुस्लिम धर्मगुरुंचे नाव लिहून विटंबना करण्यात आली होती.
advertisement
या घटनेचा निषेध म्हणून कोठला इथं अहिल्यानगर छत्रपती - संभाजीनगर रस्त्यावर मुस्लिम बांधवांचं आंदोलन सुरू होतं. रास्ता रोको केल्यानं वाहतूक कोंडी झाली होती.यानंतर मोर्चाही काढला जाणार होता. मात्र रस्ता रिकामा करण्याचे निर्देश आल्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांवर लाठीचार्ज केला. लाठीचार्जमुळे परिसरात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली होती.
दरम्यान धर्मगुरुंचे नाव रस्त्यावर लिहिल्याप्रकरणी पोलिसांनी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये दोन जणांविरोध गुन्हा दाखल केला आहे. आणि संग्राम रासकर याला अटक करण्यात आली आहे. तर आंदोलन केल्याप्रकरणी 30 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.यामध्ये सरकारतर्फे फिर्याद देण्यात आले आहे अशी माहिती पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिले आहेत.
Location :
Hingoli,Maharashtra
First Published :
September 29, 2025 11:32 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'आय लव्ह मोहम्मद'चा वाद,रांगोळीवरून राडा, एकाला अटक, पोलिसांकडून महत्वाची माहिती