ncp : 'पक्षात फूट पडली तेव्हा मलाही नेत्यांचा निरोप आला..' रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. रोहित पवारांच्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.
अहमदनगर, 11 ऑक्टोबर, साहेबराव कोकणे : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 'जेव्हा पक्षात फूट पडली, जेव्हा कुटुंबात फूट पडली तेव्हा मलाही विविध नेत्यांकडून आणि त्यांच्या मध्यस्थांकडून निरोप आला होता. तुमची जी कामं आज स्थगित झाली आहेत, चारशे कोटी रुपयांपेक्षा अधिकची ही काम आहेत, ज्यामध्ये एमआयडीसीचा देखील समावेश आहे. ती आम्ही मंजूर करून घेऊ आणि त्याला मार्गस्त करू. पण फक्त तुम्हाला एक गोष्ट करावी लागले. तुम्हाला तुमच्या आजोबांना तसेच शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांना तुम्हाला सोडावं लागेल. तेव्हा मी त्यांंना म्हटलं की काम आम्ही कशीही मंजूर करून आणू, 2024 ला लोकांच्या हिंमतीवर सत्तेत येऊन आम्ही कामं करू, पण विचारांशी तडजोड करणार नाहीत.' असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
अजित पवार यांनी राष्ट्रवादीमधून बंड केल्यानंतर पक्षात दोन गट पडले आहेत. रोहित पवार हे शरद पवार गटात आहेत. रोहित पवारांच्या या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. अजित पवार महायुतीला पाठिंबा देऊन सत्तेत सहभागी झाले आहेत. तर शरद पवार हे महाविकास आघाडीसोबत आहेत.
दरम्यान दुसरीकडे नागपुरातील हिवाळी अधिवेशनासाठी आतापर्यंत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून स्वतंत्र कार्यालयाची मागणी करण्यात आलेली नाहीये. वेगवेगळ्या कार्यालयाची मागणी न करण्यात आल्यानं राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकाच कार्यालयात बसणार का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. हिवाळी अधिवेशनासाठी नागपूर विधिमंडळ परिसरात दोन्ही गटासाठी वेगवेगळ्या कार्यालयाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मात्र दोन्ही गटाकडून अद्याप वेगवेगळ्या कार्यालयाची मागणी करण्यात आलेली नाहीये.
Location :
Ahmadnagar,Ahmadnagar,Maharashtra
First Published :
November 11, 2023 3:30 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
ncp : 'पक्षात फूट पडली तेव्हा मलाही नेत्यांचा निरोप आला..' रोहित पवारांचं मोठं वक्तव्य