Ajit Pawar : ''मी भ्रष्टाचारी असतो तर...'', विधानसभेत शपथ घेतल्यानंतर अजित पवारांचं मोठं विधान
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
पहिल्या दिवशी आपण काहीतरी वेगळं करतोय. आम्ही कमी असलो तरी अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे.काही लोक आत बसले होते. मी शपथ घेऊन उतरताना ते बाहेर निघाले होते. आज आपण शपथ घ्यायची नाही असं त्यांना सांगण्यात आलं. ईव्हीएमचा, इन्कम टॅक्सचा मुद्दा काढलाय,अशी विरोधकांचा स्ट्रेटेजी यावेळी अजित पवारांनी सांगितली.
Ajit Pawar Maharashtra Assembly Special Session : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत शपथ घेतली आहे. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी अजित पवार यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.या शपथविधीनंतर माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी मोठं विधान केले आहे.मी जर भ्रष्टाचारी असतो तर बाकिच्यांनी माझ्यासोबत कामच केलं नसतं. ही पदंच मिळाली नसती,असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले आहे.
विधानसभेत पार पडत असलेल्या शपथविधीवर विरोधकांनी सभात्याग करत बहिष्कार टाकला आहे. विरोधकांच्या या भूमिकेवर बोलताना अजित पवार म्हणाले की, मविआच्या लोकांना उद्या शपथ घ्यावीच लागेल. तरच त्यांना सभागृहात कामकाजात सहभागी होता येईल, असे त्यांनी सांगितले आहे. तसेच पहिल्या दिवशी आपण काहीतरी वेगळं करतोय. आम्ही कमी असलो तरी अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे.काही लोक आत बसले होते. मी शपथ घेऊन उतरताना ते बाहेर निघाले होते. आज आपण शपथ घ्यायची नाही असं त्यांना सांगण्यात आलं. ईव्हीएमचा, इन्कम टॅक्सचा मुद्दा काढलाय,अशी विरोधकांचा स्ट्रेटेजी यावेळी अजित पवारांनी सांगितली.
advertisement
तसेच विरोधकांनी आज विधान भवनच्या आवारात ईव्हिएम मशीनचा निषेध करत परिसर दणाणून सोडला होता.यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, मी महाविकास आघाडीत काम केलं आहे.मी त्यांचा कार्यकर्ता होतो. विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमला दोष देण्यात काही अर्थ नाही, लोकसभेला मविआला जागा मिळाल्या तेव्हा काय वाटलं नाही. ३१ निवडून आले तेव्हा ईव्हीएम मशिन चांगली होती, असा टोला देखील अजित पवारांनी विरोधकांना लगावला.
advertisement
दरम्यान आज अजित पवार यांची आज ईडीने जप्त केलेली मालमत्ता मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. दिल्ली ट्रीब्युनल कोर्टाने हा निकाल दिला आहे. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, इतकी वर्षे आम्ही त्यांच्यासोबत होतो. कोर्टाचा निकाल एका दिवसात लागत नाही. वेगवेगळी चौकशी आणि अपील करण्याचा अधिकार असतो. त्यानुसार प्रोसेस सुरू होती. आम्ही आमची भूमिका मांडली.
advertisement
तसेच मी जर भ्रष्टाचारी असतो तर बाकिच्यांनी माझ्यासोबत कामच केलं नसतं. ही पदंच मिळाली नसती. राजकीय भूमिकेतून अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला. मला जिथं न्याय मागायचा होता तिथं मागू शकतो, मी मागत होतो.
मी काहींसोबत बोललो, असे देखील अजित पवारांनी सांगितले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 07, 2024 12:55 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ajit Pawar : ''मी भ्रष्टाचारी असतो तर...'', विधानसभेत शपथ घेतल्यानंतर अजित पवारांचं मोठं विधान


