अजितदादा पुन्हा अध्यक्ष बनले, पण मुरलीधर मोहोळांशी कोणत्या वाटाघाटी? त्या बैठकीची inside Story

Last Updated:

महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन निवडणुकीतून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी चर्चेअंती माघार घेतली.

मुरलीधर मोहोळ-अजित पवार
मुरलीधर मोहोळ-अजित पवार
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन (MOA) चे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या पॅनेलमधील आदिल सुमारिवाला, प्रदीप गंधे आणि प्रशांत देशपांडे हे तिघे उपाध्यक्षपदासाठी निवडणूक न होता निवडले गेले. मुरलीधर मोहोळ हे अध्यक्षपदासाठी इच्छुक होते, मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत तोडगा काढून अजित पवार यांना अध्यक्षपद देण्याचे ठरले. अजित पवार आणि मोहोळ गटाला प्रत्येकी दोन वर्षांचे अध्यक्षपद देण्याचा निर्णय झाला आहे.
महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन निवडणुकीतून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी चर्चेअंती माघार घेतली. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड निश्चित झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्वतः अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या चर्चेतून तोडगा निघाल्यानंतर मोहोळ दोन पावले मागे गेले.
अजित पवार यांच्याकडे दोन वर्षे तर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे पुढील दोन वर्षे अध्यक्षपद राहील. त्याचबरोबर मोहोळ यांच्या गटाकडे सरचिटणीस आणि खजिनदार पद जाणार आहे. मोहोळ गटाला ११ जागा तर पवार गटाला १० जागा मिळाल्या.
advertisement
महायुतीतील समन्वयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत चर्चेनंतर मुरलीधर मोहोळ यांच्या गटालाही काही पदे देण्याचे ठरले. गेली तीस वर्षे एकहाती वर्चस्व असलेल्या अजित पवारांनी यावेळी अध्यक्षपदासाठीही तडजोड केल्याची चर्चा आहे. क्रीडा पायाभूत सुविधा, खेळाडू कल्याण आणि पारदर्शकतेसाठी अजित पवार अध्यक्ष म्हणून पुढील दोन वर्षे काम करतील.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अजितदादा पुन्हा अध्यक्ष बनले, पण मुरलीधर मोहोळांशी कोणत्या वाटाघाटी? त्या बैठकीची inside Story
Next Article
advertisement
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

View All
advertisement