Sharad Pawar Ajit Pawar : वस्तादाला धोबीपछाड देणार दादा, पवार गटाचे आमदार फुटणार? राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Maharashtra Government Formation : विधानसभा निवडणुकीत काकांना अस्मान दाखवल्यावर अजित पवार आता पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे. अजित पवार हे आपले काका ज्येष्ठ नेते शरद पवारांना आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहेत.
मुंबई : विधानसभा निवडणुकीत काकांना अस्मान दाखवल्यावर अजित पवार आता पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे. अजित पवार हे आपले काका ज्येष्ठ नेते शरद पवारांना आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहेत. विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या शरद पवारांचे उमेदवार गळाला लावण्याचा प्रयत्न अजित पवारांकडून सुरू आहे. शरद पवारांचे काही खासदार आणि आमदार हे सीमोल्लंघन करण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने हा दावा केला आहे.
विधानसभा निवडणुकीत दादांची सरशी...
राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आणि काका शरद पवार यांच्याशी फारकत घेत अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या 40 आमदारांसह महायुतीत प्रवेश केला. त्यानंतर राज्यात अजित पवार विरुद्ध शरद पवार असा राजकीय संघर्ष सुरू झाला. या संघर्षातील पहिल्या टप्प्यात लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना शरद पवारांनी जोरदार धोबीपछाड दिला. तर, दुसरा राजकीय संघर्ष हा विधानसभेत दिसून आला. यामध्ये अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाची सव्याज परतफेड केली. विधानसभा निवडणुकीत शरद पवारांचे फक्त 10 उमेदवार विजयी झाले.
advertisement
अजित पवार गटाच्या नेत्याचा दावा काय?
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांचे ट्वीट चर्चेत आले आहे. रोहित पवारांना टोला लगावताना अमोल मिटकरी यांनी म्हटले की, तो लोकशाही वाचवायला चालला आहे. पण, तुतारीचे वर्धा ते भिवंडी खासदार व सहा आमदार वाचव! देवगिरी व सागर बंगल्या बाहेर चकरा सुरू असल्याचे मिटकरी यांनी म्हटले. मिटकरी यांच्या ट्वीटने पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.
advertisement
तो लोकशाही वाचवायला चाललाय 😄अरे तुझ्या तुतारी चे वर्धा ते भिवंडी खासदार व सहा आमदार वाचव! देवगिरी व सागर बंगल्या बाहेर चकरा सुरु आहेत त्यांच्या #बालमित्रमंडळ 😄
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) December 2, 2024
खासदार सुरेश म्हात्रेंनी घेतली फडणवीसांची भेट
advertisement
भिवंडीचे खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांनी सोमवारी दुपारी सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र, सुरेश म्हात्रे यांनी ही भेट वैयक्तिक कामासाठी होती असे म्हणत आपण शरद पवारांसोबत आहोत, असे स्पष्ट केले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 03, 2024 1:04 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sharad Pawar Ajit Pawar : वस्तादाला धोबीपछाड देणार दादा, पवार गटाचे आमदार फुटणार? राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा


