तिकीट कुणाला द्यायचं? सुनेत्रा पवारांचा सल्ला, अजितदादांची फटकेबाजी, आधीच सांगितलं असतं तर...

Last Updated:

Ajit Pawar: अजित पवार यांनी नागपूरच्या शिबिरात जोरदार फटकेबाजी करून आपल्यातील मिश्किल स्वभावाची प्रचिती पुन्हा महाराष्ट्राला दाखवली.

अजित पवार-सुनेत्रा पवार
अजित पवार-सुनेत्रा पवार
नागपूर : सर्वसामान्य जनता असो, कार्यकर्ता असो, वा नेता... अजितदादांच्या तावडीतून कुणीच सुटत नाही. राष्ट्रवादीच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी पक्षात कोणते संघटनात्मक बदल केले पाहिजेत इथपासून स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकेतील तिकीट वाटपावरही भाष्य केले. याचाच धागा पकडून अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी करून आपल्यातील मिश्किल स्वभावाची प्रचिती पुन्हा महाराष्ट्राला दाखवली. अजित पवार यांच्या फटकेबाजीने उपस्थित नेते हसून लोटपोट झाले.
आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने पक्षाने कशी तयारी करावी? महापालिका जिंकण्यासाठी काय रणनीती असावी? या कारणासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे एक दिवसीय शिबिर नागपुरात संपन्न झाले. या शिबिराला संबोधित करताना अजित पवार यांनी चौफेर फटकेबाजी केली.

सुनेत्रा पवार-अजित पवार यांच्यात जुगलबंदी

संघटना कशी वाढवावी याबद्दलच्या सूचना मला सुनेत्रा पवार यांनी केल्या आहेत. तसेच आगामी निवडणुकांत उमेदवारी कुणाला द्यावी, याबद्दलचे सूतोवाचही त्यांनी केले. या सगळ्यासंदर्भात त्यांनी आधीच मार्गदर्शन केले असते तर आपण कुठल्या कुठे गेलो असतो... असे मिश्किलपणे अजित पवार म्हणाले. माझ्या भाषणासंबंधीचा गृहपाठ आधीच सुनेत्रा पवार करून घेतात, असे चिमटेही अजित पवार यांनी काढले. दादांच्या फटकेबाजीवर उपस्थित नेत्यांमध्ये हास्यकल्लोळ झाला.
advertisement

गृहपाठ करूनच भाषण, सुनेत्रा पवार नोंदी ठेवतात, चुकले तर माझे काही खरे नाही

यापूर्वी मी भाषण करायचो तर रात्रभर माझा गृहपाठ व्हायचा आणि मग मी भाषण करायचो. आता फक्त असे झाले की सुनेत्रा पवार यांनी आधी भाषण केले, मी नंतर करतोय. रात्री माझा गृहपाठ झाला, त्या पद्धतीने आज मी भाषण करतोय. आता समोर सुनेत्रा बसलीये, तिथे नोंद चाललीय. कुठलं बरोबर आहे, कुठलं नाही, ती वहीत टिक करतीये. भाषणात काही राहिले तर माझे काही खरे नाही, असे अजित पवार म्हणाले.
advertisement
अजित पवार यांच्या फटकेबाजीवर सुनेत्रा पवार यांनी अक्षरश: डोक्याला हात लावला. सुनेत्रा पवार यांच्या शेजारी बसलेले सुनील तटकरे यांनाही हसू आवरले नाही. उपस्थित मंत्र्‍यांनीही टाळ्या वाजवून अजित पवार यांच्या मिश्किल फटकेबाजीला दाद दिली.

सुनेत्रा पवार यांनी भाषणात काय म्हटले?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय पातळीवर अधिक सक्षमपणे उभे करण्यासाठी विचारपूर्वक विस्ताराच्या रोडमॅपबाबत विचार करायला हवा. महाराष्ट्राच्या वैचारिक आणि विकासाच्या मॉडेलला राष्ट्रीय स्तरावर मांडण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर, महाराष्ट्राबाहेरील किमान १०-१५ महत्त्वपूर्ण मतदारसंघांची निवड करून, त्यावर लक्ष केंद्रित करणे, त्या ठिकाणी विजय मिळवणे किंवा सक्षमतेने वाटाघाटी करणे यावरही लक्ष देणे गरजेचे आहे. प्रत्येक मतदारसंघासाठी समाज रचना, स्थानिक प्रमुख तीन समस्या आणि बूथ-स्तरीय आराखडा लक्षात घेऊन सूक्ष्म नियोजन करण्याची गरज असल्याचे सुनेत्रा पवार यांनी अधोरेखित केले.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
तिकीट कुणाला द्यायचं? सुनेत्रा पवारांचा सल्ला, अजितदादांची फटकेबाजी, आधीच सांगितलं असतं तर...
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement