MHADA Lottery: मुंबईमध्ये घ्या स्वत:चं घर! 5000 घरांच्या लॉटरीत अनेकांना सुवर्णसंधी, कधी अन् कुठे?
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
मुंबई उपनगरामध्ये ज्यांचे घर घेण्याचे स्वप्न आहे, त्यांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. मुंबई उपनगरामध्ये म्हाडाकडून तब्बल 5 हजार घराची सोडत निघणार आहे. येत्या काही महिन्यांमध्ये या घरांची जाहिरात निघण्याची शक्यता आहे.
नोकरदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबई उपनगरामध्ये ज्यांचे घर घेण्याचे स्वप्न आहे, त्यांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. मुंबई उपनगरामध्ये म्हाडाकडून तब्बल 5 हजार घराची सोडत निघणार आहे. येत्या काही महिन्यांमध्ये या घरांची जाहिरात निघण्याची शक्यता आहे. मुंबई किंवा मुंबई उपनगरांमध्ये स्वत:चं घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी ही एक प्रकारची आनंदाची बातमीच म्हणता येईल. मुंबई आणि मुंबई उपनगरांमधील अनेक भागांचा यामध्ये समावेश असणार आहे.
म्हाडाच्या मुंबई मंडळाने 2026 मध्ये तब्बल 5 हजार घरांची सोडत काढण्याची तयारी पूर्ण केली आहे. याची जाहिरात मार्च अखेर किंवा एप्रिलच्या सुरुवातीला प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून या घराच्या सोडतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. गोरेगावची पत्राचाळ, विक्रोळी, सायन प्रतिक्षानगर आणि अँटॉप हिल या भागामध्ये 5 हजार घरांची सोडत जाहीर केली जाणार आहे. गेल्या वर्षी म्हाडाकडून घराची सोडत काढण्यात येणार होती. परंतु म्हणावे तितकी घराची उपलब्धता नसल्यामुळे ती जाहिरात काढण्यात आली नव्हती. गेल्या वर्षी घरांच्या उपलब्धते अभावी रखडलेली म्हाडाची सोडत 2026 या वर्षी मोठ्या संख्येने पार पडणार आहे.
advertisement
गेल्या वर्षीची कसर भरून काढण्यासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून मोठ्या प्रमाणावर घरांची सोडत काढली आहे. जरीही म्हाडाकडून घराची घोषणा 2026 मध्ये करण्यात आली असली तरीही लाभार्थ्यांना घराचा ताबा मिळण्यासाठी 2027 ते 2029 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. गोरेगावच्या पत्राचाळमध्ये मोठ्या प्रमाणावर घरांची सोडत निघणार आहे. 2500 घरांची सोडत निघणार असून तिथे अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी घरं उपलब्ध होणार आहेत. बोरिवलीतल्या मागाठाणेमध्ये 20 मजली इमारत सुद्धा बांधली जाणार आहे. जिथे 128 घरे उच्च उत्पन्न गटातील लोकांसाठी उपलब्ध होणार आहेत. ज्याचे काम 2027 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. प्रतीक्षानगरमध्ये 22 मजल्यांच्या तीन इमारतींचे काम अंतिम टप्प्यात असून, तिथे मध्यम गटासाठी 264 घरं उपलब्ध होणार आहेत. तसेच कन्नमवार नगर आणि चेंबूरच्या टिळकनगरमध्येही मध्यम आणि अल्प गटासाठी मोठ्या प्रमाणावर घरांची निर्मिती सुरू आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 14, 2026 6:11 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
MHADA Lottery: मुंबईमध्ये घ्या स्वत:चं घर! 5000 घरांच्या लॉटरीत अनेकांना सुवर्णसंधी, कधी अन् कुठे?







