अकोला-अकोट 'मेमू' गाड्यांच्या वेळेत बदल, १८ डिसेंबरपासून नवीन वेळापत्रक, लगेच चेक करा
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
अकोला-अकोट दरम्यान धावणाऱ्या तीन मेमू गाड्यांच्या वेळेत रेल्वे प्रशासनाने बदल केला असून सुधारित वेळापत्रक १८ डिसेंबरपासून लागू होणार आहे. प्रवाशांनी नवीन वेळ तपासावी.
अकोला: अकोला आणि अकोट दरम्यान दररोज प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी आणि प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या मार्गावर धावणाऱ्या तीन मेमू गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने हे सुधारित वेळापत्रक १८ डिसेंबरपासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवासाला निघण्यापूर्वी प्रवाशांनी आपल्या गाडीची नवीन वेळ नक्की तपासावी.
डाऊन गाडीच्या वेळेत बदल
डाऊन मार्गावर धावणाऱ्या ५९७०८ क्रमांकाच्या अकोट-अकोला मेमू गाडीच्या वेळेत मोठा बदल झाला आहे. ही गाडी पूर्वी सकाळी ७:१० वाजता सुटायची, पण आता ती सकाळी ८:२० वाजता अकोटहून सुटेल. ही गाडी पास्टूलमार्गे सकाळी ९:४०, गांधी स्मारक मार्गे सकाळी ९:५४ आणि उगावा मार्गे सकाळी १०:०४ वाजता अकोला येथे पोहोचेल. पूर्वी ही गाडी अकोला येथे सकाळी १०:२० वाजता पोहोचायची.
advertisement
दुपार आणि सायंकाळच्या वेळेत बदल
दुपारच्या वेळेत धावणारी ५९७०९ क्रमांकाची मेमू गाडी अकोला येथून दुपारी २ वाजता सुटेल, तर परत येणारी ५९७१० क्रमांकाची गाडी अकोट येथून दुपारी ३:३० वाजता सुटेल. ही गाडी सायंकाळी ५:४० वाजता अकोला येथे पोहोचेल. तसेच, सायंकाळच्या वेळेत धावणारी ५९७११ क्रमांकाची मेमू गाडी अकोला येथून सायंकाळी ६ ऐवजी ६:३० वाजता सुटेल आणि सायंकाळी ६:४० वाजता अकोट येथे पोहोचेल.
view commentsLocation :
Maharashtra
First Published :
December 12, 2025 2:26 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अकोला-अकोट 'मेमू' गाड्यांच्या वेळेत बदल, १८ डिसेंबरपासून नवीन वेळापत्रक, लगेच चेक करा










