निवडणूक काळात टीका टाळली पण विधानसभा जिंकताच शाह फॉर्मात, पवार आणि ठाकरेंवर प्रचंड हल्लाबोल

Last Updated:

Amit Shah Shirdi Adhiweshan: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत शिर्डीत भाजपचे अधिवेशन पार पडत आहे. या अधिवेशनाला अमित शाह यांनी संबोधित केले.

अमित शाह-शरद पवार-उद्धव ठाकरे
अमित शाह-शरद पवार-उद्धव ठाकरे
शिर्डी : लोकसभा निवडणुकीत पिछेहाट झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचील वरिष्ठ नेत्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका करणे टाळले होते. परंतु विधानसभेत ऐतिहासिक यश मिळाल्यानंतर शिर्डी होत असलेल्या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली. शरद पवार यांनी कायमच दगाफटक्याचे राजकारण केले. त्यांचे राजकारण २० फूट जमिनीत गाडण्याचे काम राज्यातील जनतेने केले तसेच बाळासाहेबांची विचारधारा सोडून गद्दारी करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना जनतेने दागा दाखवली, अशा शब्दात अमित शाह यांनी दोन्ही नेत्यांवर तोफ डागली.
विधानसभेची मोहीम फत्ते केल्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा किल्ला सर करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे संघटनात्मक शिबीर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत शिर्डीत पार पडत आहे. या अधिवेशनाला अमित शाह यांनी संबोधित केले. भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी सर्व महापुरुषांचे स्मरण करून भाजप कार्यकर्त्यांचे महाविजयसाठी अभिनंदन केले.

शरद पवार यांचा एक फोटो पाहिला...

advertisement
अमित शाह म्हणाले, शरद पवार यांचा मी एक फोटो पाहिला. त्यांच्यामागे महाराष्ट्रातील प्रादेशिक विभागांचा नकाशा लावला होता. लोकसभेत कोणत्या विभागात काय काय होईल याची भविष्यवाणी ते समोर बसलेल्या पत्रकारांसमोर करीत होते. मी त्यांना सांगू इच्छितो, तुम्ही सांगितलेल्या प्रदेशात आम्ही काय काय केलं! उत्तर महाराष्ट्रात 19, कोकणात 16, पश्चिम महाराष्ट्रात 24 जागा आम्ही जिंकल्या. ज्यांनी आपल्याला धोका दिल्या त्यांना जागा दाखविण्याचे काम जनतेने केले, असे शाह म्हणाले.
advertisement

शरद पवारांच्या दगा फटक्याच्या राजकारणाला २० फूट जमिनीत गाडलं, उद्धव ठाकरेंना जागा दाखवली

शरद पवार यांनी दगाफटक्याचं राजकारण केलं. शरद पवारांच्या दगा फटक्याच्या राजकारणाला २० फूट जमिनीत मातीत घालण्याचे काम महाराष्ट्राने केले. हिंदुत्व आणि बाळासाहेबांच्या विचारांशी द्रोह करणाऱ्या उद्धव ठाकरेंना जनतेने जागा दाखवली.यातून सनातन धर्म आणि हिंदुत्वाचा महाराष्ट्राने कायमच पुरस्कार केल्याचे शाह म्हणाले.
advertisement

एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी हेच खरे पक्ष

आपल्याबरोबरच एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला जोरदार यश मिळाले. एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच बाळासाहेबांची शिवसेना तर अजितदादांची राष्ट्रवादीच खरी राष्ट्रवादी असल्याचे अमित शाह म्हणाले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
निवडणूक काळात टीका टाळली पण विधानसभा जिंकताच शाह फॉर्मात, पवार आणि ठाकरेंवर प्रचंड हल्लाबोल
Next Article
advertisement
Dhule Election: भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आर
  • मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या मतदान यंत्राची तोडफोड

  • भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

View All
advertisement