Malavya Rajyog 2026: आपलं नशीब आता जागं झालं! मार्चच्या सुरुवातीला मालव्य राजयोग, या राशींना पैसा, प्रमोशन आणि..
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Astrology: पैशांचा मार्ग नेहमी खुला राहण्यासाठी शुक्राची साथ माणसाला हवी असते. वैदिक ज्योतिषशास्त्रात शुक्र हा पैसा, प्रेम, लग्न आणि सुखाचा कारक मानला जातो. ज्यांच्या पत्रिकेत शुक्र प्रबळ असतो, त्यांना भौतिक सुखांसोबतच आर्थिक स्थैर्यही मिळते. म्हणूनच शुक्राच्या राशी बदलाचा परिणाम सर्व 12 राशींवर दिसून येतो.
मराठी पंचांगानुसार, शुक्र साधारण दर 26 दिवसांनी आपली राशी बदलतो. सध्या तो कुंभ राशीत आहे, पण 2 मार्च 2026 रोजी पहाटे साधारण 1 वाजून 1 मिनिटाच्या सुमारास तो मीन राशीत प्रवेश करेल आणि 26 मार्चपर्यंत तिथेच राहील. विशेष म्हणजे मीन ही शुक्राची उच्च राशी असल्याने तिथे मालव्य राजयोग म्हणजेच लक्ष्मी योग तयार होणार आहे.
advertisement
लक्ष्मी योग कसा होतो - ज्योतिषानुसार, जेव्हा शुक्र आपल्या उच्च राशीत (मीन) किंवा स्वतःच्या राशीत (वृषभ आणि तूळ) असतो आणि पत्रिकेच्या केंद्र भावात (1, 4, 7 किंवा 10 व्या घरात) स्थित असतो, तेव्हा लक्ष्मी योग तयार होतो. याला पंच महापुरुष योगांपैकी एक मानले जाते, जो व्यक्तीला धन, ऐश्वर्य आणि सुख देतो.
advertisement
advertisement
advertisement
कर्क - कर्क राशीच्या लोकांना या काळात अचानक धनलाभ होऊ शकतो. अडकलेले पैसे परत मिळतील आणि मालमत्तेशी संबंधित व्यवहारातून फायदा होईल. या काळात तुमचा कल अध्यात्माकडे वाढल्यामुळे मनाला शांती मिळेल. कुटुंब आणि मित्रांसोबत चांगला वेळ जाईल. लग्नाचे प्रस्ताव येण्यासाठी हा काळ उत्तम आहे.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)









