होळीआधी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण! चांदी ७,४०० रुपयांनी स्वस्त, तर सोनंही उतरलं
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
जागतिक बाजारातील घडामोडींमुळे सोन्याचा भाव १३०० रुपयांनी तर चांदीचा दर ७४०० रुपयांनी घसरला. इंडियन बुलियन असोसिएशननुसार ही घसरण तात्पुरती असू शकते.
गेल्या काही दिवसांपासून गगनभरारी घेणाऱ्या सोन्या-चांदीच्या किमतींना आता अचानक ब्रेक लागला आहे. जागतिक बाजारपेठेतील घडामोडी आणि गुंतवणूकदारांनी केलेल्या नफेखोरीमुळे मौल्यवान धातूंच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. विशेषतः चांदीच्या दरात ७,४०० रुपयांची मोठी घट झाली असून, सोन्याचा भावही १,३०० रुपयांनी खाली आला आहे.
बाजारातील या पडझडीनंतर सोन्या-चांदीचे भाव आता नव्या पातळीवर स्थिरावले आहेत. चांदीच्या किमतीत तब्बल ३ टक्क्यांची घसरण झाली असून, आता चांदी २ लाख ६० हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली आहे. सोन्याचा भाव १,३०० रुपयांनी कमी झाल्यामुळे आता १० ग्रॅम सोन्यासाठी १ लाख ६२ हजार ९०० रुपये मोजावे लागणार आहेत.
इंडियन बुलियन असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार आज मुंबईत 24 कॅरेट सोन्याचे दर 1 लाख 64 हजार वर पोहोचले आहेत. २२ कॅरेटचे दर १ लाख ५० हजार रुपये आहेत. दर 18 कॅरेट सोन्याचे दर १ लाख २३ हजार रुपये आहे. चांदीचा दर २ लाख ७७ हजार रुपये प्रति किलोवर दर पोहोचला आहे.
advertisement
सोन्याच्या वाढत्या किमती पाहून अनेक गुंतवणूकदारांनी आपला नफा वसूल करण्यासाठी विक्रीचा सपाटा लावला, परिणामी दरात घट झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यामुळे सोन्या-चांदीतील गुंतवणूक काही प्रमाणात कमी झाली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतील बदलत्या स्थितीचा परिणाम थेट धातूंच्या किमतीवर दिसून येत आहे.
ज्यांनी लग्नसराईसाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोन्या-चांदीच्या खरेदीचा विचार केला होता, त्यांच्यासाठी ही भाववाढ कमी होणे हा एक दिलासा ठरू शकतो. मात्र, आर्थिक जाणकारांच्या मते, ही घसरण तात्पुरती असू शकते. जागतिक स्तरावरील वाढता आर्थिक ताण आणि युद्धाची भीती पाहता, या वर्षात सोन्याच्या किमती पुन्हा एकदा उच्चांकी पातळी गाठण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 27, 2026 12:54 PM IST
मराठी बातम्या/मनी/
होळीआधी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण! चांदी ७,४०० रुपयांनी स्वस्त, तर सोनंही उतरलं








