नव्या AC खरेदीसाठी जाताय? अजिबात करु नका या 4 चुका, वीज बिल येईल जास्त
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
उन्हाळ्यापूर्वी नवा एसी घेण्याचा प्लॅन आहे? जरा थांबा. फक्त टन किंवा किंमत पाहून निर्णय घेणे तुमच्या खिशावर ओझं टाकू शकते. नवीन BEE नियमांनंतर योग्य स्टार रेटिंग आणि इन्व्हर्टर टेक्नॉलॉजी निवडणे खुप गरजेचे झाले आहे. जाणून घ्या 4 मोठ्या चुका, ज्या वीज बिल दुप्पट करु शकतात.
मुंबई : उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. या काळात नवीन एयर कंडीशनर खरेदी करणं हा बऱ्याच जणांचा प्लॅन असतो. मात्र अनेक लोक हे घाईघाईत अशा काही चुका करता, ज्यामुळे त्यांना कूलिंग बरोबर मिळत नाही. यासोबच वीज बिलही खुप जास्त येते. भारतात वीज बिलाच्या वाढत्या किंमती आणि नवीन BEE स्टँडर्ड्स (2026 अपडेट) सह आता एनर्जी एफिशिएंट AC निवडणे आणखी गरजेचे झाले आहे.
चुकीचा निर्णय घेतल्याने हजारो रुपये वार्षिक जास्त खर्च होऊ शकतात. तुम्ही रोज 6-8 तास एसी चालवत असाल तर 5-स्टार इन्व्हर्टर मॉडल दीर्घ काळात खुप जास्त बचत करते.
कमी स्टार रेटिंग किंवा चुकीच्या क्षमतेचा एसी खरेदी करुन सुरुवातीला बचत होते. मात्र नंतर वीज बिल आणि मेंटेनेंसचं ओझं वाढतं. योग्य माहितीसह खरेदी केली तर कूलिंग चांगली मिळेल आणि बिल कंट्रोलमध्ये राहील. चला 4 अशा चुकांविषयी जाणून घेऊया, ज्या टाळून तुम्ही चांगली डील मिळवू शकाल. यामुळे नंतर तुम्हाला पाश्चातापही होणार नाही.
advertisement
1. केवळ टनेज (क्षमता) वर आधारित एसी खरेदी करणे
लोकांची सर्वात मोठी चूक म्हणजे केवळ 1 टन, 1.5 टन किंवा 2 टन क्षमतेवर आधारित एसी निवडणे. खोलीच्या आकारानुसार टनेज महत्वाचे आहे, परंतु ते थंड करण्याची क्षमता (वॅट्समध्ये), खोलीचे इन्सुलेशन, सूर्यप्रकाश आणि छताची उंची याकडे दुर्लक्ष करतात. खूप लहान एसीमुळे कंप्यूटर सतत चालू राहू शकतो, जास्त वीज वापरली जाऊ शकते. खूप मोठा एसी वारंवार चालू आणि बंद केला जाऊ शकतो, ज्यामुळे ऊर्जा वाया जाते. म्हणून, योग्य टनेज निवडा. 100-120 चौरस फूटसाठी 1 टन, 120-180 चौरस फूटसाठी 1.5 टन आणि त्यापेक्षा मोठ्या खोल्यांसाठी 2 टन योग्य आहे.
advertisement
2. स्टार रेटिंगकडे दुर्लक्ष करु नका
अनेक लोक सुरुवातीला कमी किंमतीच्या नादात 3-स्टार किंवा त्यापेक्षा कमी रेटिंगचा एसी घेतात. 2026 मध्ये BEE च्या नव्या नियमानंतर स्टार रेटिंग आणखी कठोर झाली आहे. 5-स्टार AC कमी वीज वापरते. तुम्ही AC रोज चालवला तर 3-स्टार पेक्षा 5-स्टारमध्ये फरक 2-3 वर्षांत पूर्ण रिकव्हर होतो. 3-स्टार स्वस्त दिसते. पण दीर्घकाळात बिल दुप्पट करु शकते. नेहमी ISEER व्हॅल्यू चेक करा आणि 5-स्टार इन्व्हर्टर निवडा.
advertisement
3. इन्व्हर्डर टेक्नॉलॉजीच्या एसीला इग्नोर करु नका
नॉन-इन्वर्टर एसी स्वस्त असतात. मात्र कंप्यूटर वारंवार ऑन-ऑफ होते. ज्यामुळे वीज जास्त लागते आणि कूलिंग असमानराहते. इन्वर्टर एसी स्पीड अॅडजस्ट करते. फास्ट कूलिंग देते आणि शांत चालते. यामुळे 30-50% पर्यंत वीज बचत होते. उन्हाळ्यात दीर्घकाळापर्यंत वापरासाठी इन्वर्टर बेस्ट आहेत. नॉन-इन्वर्टर निवडून तुम्हाला भविष्यात पाश्चाताप होऊ शकतो.
advertisement
4. ब्रांड, सर्व्हिस आणि फीचर्सला कमी महत्त्व देणे
केवळ किंमत ब्रांड नेम पाहून एसी खरेदी करणेही चुकीचे आहे. चांगल्या ब्रांडसह सर्व्हिस सेंटरची उपलब्धता, वॉटंरी (कंप्रेसरवर 10 वर्षांपर्यंत), ऑटो-क्लीन, कूपर कंडेंसर आणि अँटी-बॅक्टीरियल फीचर्स अवश्य चेक करा. खराब सर्व्हिसने एसी लवकर खराब होतो आणि वीज जास्त खर्च होते. सोबतच इंस्टॉलेशन योग्य नसेल तर बिल वाढते. या 4 चुका टाळल्या तर तुमचा नवा एसी खोली थंड ठेवेलच यासोबतच वीज बिलही कंट्रोलमध्ये ठेवेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 27, 2026 12:32 PM IST










