Ajit Pawar : दोन दिवस दिल्लीत तळ ठोकला, तरी शाहांची भेट घेण्यास अपयशी, अजितदादांचं अर्थखातं जाणार?

Last Updated:

अजित पवार दुपारी 2 वाजता मुंबईत दाखल होऊन थेट राजभवनला जाणार आहेत. तसेच सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांनी 3.30 ची वेळ दिली आहे.

अजित पवार
अजित पवार
Ajit Pawar News : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारपासून अॅक्टीव्ह मोडवर आले आहेत. त्यामुळे सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. तत्पुर्वी एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावरून अडून होते. पण मुख्यमंत्रीपदाचा त्याग करावा लागल्यास शिंदेंनी गृहमंत्री पद आणि मागच्या सरकारमध्ये अजित पवारांकडे असलेले अर्थखात्यासह इतर खात्याची मागणी केली होती. त्यामुळे एकनाथ शिंदेंची ही चाल लक्षात अजित पवारांनी दिल्ली गाठली होती. दोन दिवसाच्या दिल्ली दौऱ्यात अजित पवारांची अमित शाहांची भेटच होऊ शकली नाही आहे. त्यामुळे अर्थखात आता कुणाच्या पारड्यात पडणार? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात होतेय.
खरं तर विधानसभा निवडणूक निकालानंतर अजित पवारांनी मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देऊन एकनाथ शिंदेंना चेक दिला होता. आता शिंदेंकडून अर्थ खात्याची मागणी करण्यात आल्याने अजित पवारच चेकमेट मिळाला होता.त्यामुळे पराभव टाळण्यासाठी अजित पवारांनी सोमवारी रात्री 8 वाजता दिल्लीत पोहोचले होते. मात्र दोन दिवस दिल्लीत थांबून देखील अजित पवारांची अमित शांहांशी भेटच झाली नाही आहे. त्यामुळे आता अमित शाहांनी आता अजित पवारांना भेट टाळल्याची चर्चा सूरू झाली आहे.
advertisement
अजित पवार सोमवारी रात्री दिल्लीत दाखल झाले होते. त्याचवेळी अमित शाहा चंदीगडला निघून गेले होते. त्यानंतर मंगळवारी अमित शाहा आणि अजित पवारांची भेट होईल, अशी अपेक्षा होती. मात्र मंगळवारी दिवसभर अमित शहा यांनी अजित पवार यांना भेट दिली नाही आहे. विशेष म्हणजे अजित पवार या भेटीत राष्ट्रवादीला ज्यादा मंत्रिपद मिळावीत असा दावा करणार होते. त्याचसोबत शिवसेना आणि राष्ट्रवादीला समान मंत्रीपदे देण्याची मागणी करणार होते. तसेच अजित पवारांना केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद हवे असल्याची माहिती होती. पण आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अवाजवी मागण्यांना टाळण्याकरता अमित शहा भेट नाकारत असल्याची चर्चा सूरू झाली आहे. त्यामुळे आता दिल्लीतून अजित पवारांना खाली हात परतावे लागणार आहे.
advertisement
दरम्यान अजित पवार दुपारी 2 वाजता मुंबईत दाखल होऊन थेट राजभवनला जाणार आहेत. तसेच सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांनी 3.30 ची वेळ दिली आहे. आणि शपथवीधी सोहळ्याची तयारी करण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात थोड्यावेळात बैठक सुरू होणार असल्याची माहिती आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ajit Pawar : दोन दिवस दिल्लीत तळ ठोकला, तरी शाहांची भेट घेण्यास अपयशी, अजितदादांचं अर्थखातं जाणार?
Next Article
advertisement
Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement