'राज'पूत्र कुठून निवडणूक लढणार? मुंबईच्या दोन मतदारसंघात अमित ठाकरेंचे बॅनर!
- Published by:Shreyas
Last Updated:
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंचे पूत्र अमित ठाकरे विधानसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. यानंतर मुंबईच्या दोन मतदारसंघांमध्ये अमित ठाकरेंचे बॅनर लावण्यात आले आहेत.
मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंचे पूत्र अमित ठाकरे विधानसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पार पडलेल्या मनसेच्या बैठकीत अमित ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी दर्शवली. अमित ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर ते कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दुसरीकडे मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतल्या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये अमित ठाकरेंचे बॅनर लावले आहेत. या बॅनरमध्ये अमित ठाकरेंनी याच विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.
अमित ठाकरेंनी निवडणूक लढवावी म्हणून भांडुप आणि मागाठाणेमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी बॅनर लावले आहेत. मागाठाणे विधानसभा विजयासाठी सज्ज, प्रतीक्षा फक्त राज साहेब ठाकरेंच्या आदेशाची, भांडुपकरांची मागणी अमित ठाकरे हेच भांडुपचे आमदार, असे बॅनर या दोन्ही मतदारसंघामध्ये लावण्यात आले आहेत.
अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवावी म्हणून माहीम, भांडुप, मागाठाणेमधल्या मनसे कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे. नुकत्याच झालेल्या मनसेच्या विधानसभा निवडणूक तयारीच्या बैठकीत अमित ठाकरेंनी निवडणूक लढवावी, अशी भूमिका मनसेच्या नेत्यांनी घेतली होती. आपण कुठूनही निवडणूक लढण्यास तयार असल्याचं वक्तव्य अमित ठाकरेंनी केलं होतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 18, 2024 7:37 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'राज'पूत्र कुठून निवडणूक लढणार? मुंबईच्या दोन मतदारसंघात अमित ठाकरेंचे बॅनर!


