Mumbai News: डॉक्टर गौरी गर्जे प्रकरणात मोठा ट्विस्ट, पती अनंत गर्जेला पुन्हा अटक

Last Updated:

पंकजा मुंडेंचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जेच्या पत्नी गौरी गर्जे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पती अनंत गर्जे याला पुन्हा अटक करण्यात आली.

News18
News18
राहुल झोरी, प्रतिनिधी मुंबई: भारतीय जनता पक्षाच्या आमदार आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी गर्जे यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. एका राजकीय व्यक्तीशी कनेक्शन असणाऱ्या व्यक्तीच्या उच्चशिक्षित पत्नीने अशाप्रकारे जीवन संपवल्याने एकच खळबळ उडाली होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर वरळी पोलिसांनी पती अनंत गर्जेला अटक केली होती.
आता गौरी गर्जे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. अनंत गर्जे याला पुन्हा अटक करण्यात आली आहे. गौरी गर्जे मृत्यू प्रकरणात तपासासाठी राज्य सरकारने बनवलेल्या विशेष तपास पथकाने ही अटक केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात गौरी गर्जे मृत्यू प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
advertisement
अनंत गर्जेला आज पुन्हा एकदा कोर्टात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, एसआयटीने गर्जेला अटक केली आहे. डीसीपी रागसुधा यांच्या नेतृत्वात एसआयटीकडून सुरू पुढील तपास सुरू आहे.
खरं तर, ज्यावेळी गौरी गर्जे मृत्यू प्रकरण समोर आलं होतं. तेव्हा काही तासांतच वरळी पोलिसांनी अनंत गर्जेला अटक केली होती. तेव्हापासून गर्जे आधी पोलीस कोठडीत आणि त्यानंतर न्यायालयीन कोठीडीत आहे. वरळी पोलिसांनी अटक केलेल्या प्रकरणात त्याला अद्याप जामीन मिळाला नाही. अशातच त्याला दुसऱ्यांदा अटक केली आहे. ही अटक मुख्यमंत्र्यांनी स्थापन केलेल्या एसआयटीकडून झाली आहे. त्यामुळे आता एसआयटीच्या तपासात अजून काय माहिती समोर येणार? हे पाहावं लागणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mumbai News: डॉक्टर गौरी गर्जे प्रकरणात मोठा ट्विस्ट, पती अनंत गर्जेला पुन्हा अटक
Next Article
advertisement
BMC Election: निवडणूक आयोगाचा प्लॅन तयार, मतदान-निकालाच्या तारखा ठरल्या, २४ तासांत कधीही आचारसंहिता?
EC चा प्लॅन तयार, मतदान-निकालाच्या तारखा ठरल्या, २४ तासांत आचारसंहिता?
  • EC चा प्लॅन तयार, मतदान-निकालाच्या तारखा ठरल्या, २४ तासांत आचारसंहिता?

  • EC चा प्लॅन तयार, मतदान-निकालाच्या तारखा ठरल्या, २४ तासांत आचारसंहिता?

  • EC चा प्लॅन तयार, मतदान-निकालाच्या तारखा ठरल्या, २४ तासांत आचारसंहिता?

View All
advertisement