'मुलाला मारलं तिथेच नाती संपली', बंडू आंदेकरनंतर गणेश कोमकरही निवडणुकीच्या रिंगणात, पत्नीकडून अर्ज दाखल

Last Updated:

पुण्यातील कुख्यात गुंड आणि आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह त्याच्या कुटुंबातील लक्ष्मी आंदेकर आणि वनराज आंदेकरची पत्नी सोनाली आंदेकर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

News18
News18
पुण्यातील कुख्यात गुंड आणि आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह त्याच्या कुटुंबातील लक्ष्मी आंदेकर आणि वनराज आंदेकरची पत्नी सोनाली आंदेकर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तिघांना शनिवारी अर्जही दाखल करायला आणलं होतं. यानंतर वनराज आंदेकर खून प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश कोमकरही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची शक्यता आहे. याबाबत माहिती गणेश कोमकरची पत्नी आणि आयुष कोमकरची आई कल्याणी कोमकरने स्वत: दिली आहे.
कल्याणी कोमकर यांनी पत्रकार परिषद घेत आंदेकर कुटुंबाला विरोध केला आहे. आंदेकर कुटुंबाला जो पक्ष तिकीट देईल, त्या पक्षाच्या कार्यालयासमोर जाऊन आत्मदहन करणार आहे, असा इशाराही कोमकर यांनी दिला.
आंदेकर कुटुंबाला असलेल्या विरोधाबाबत विचारलं असता त्या म्हणाल्या की, माझा सगळ्यांनाच विरोध आहे. मूळ म्हणजे बंडू आंदेकरांना. ते माझे सख्खे वडील असून माझ्या मुलाचे आजोबा आहेत. तरी त्यांनी असं पाऊल उचललं. त्यामुळे मला त्यांच्याविषयी आता काही वाटत नाही. त्यांनी जेव्हा माझ्या मुलाला मारलं. तेव्हाच सगळी नाती संपली. आता मला त्यांच्याविषयी काहीच वाटत नाही.
advertisement
आंदेकरांना तिकीट मिळालं तर भूमिका काय असणार? असं विचारलं असता कल्याणी कोमकर म्हणाल्या, जो पक्ष त्यांना तिकीट देईल, त्यांच्या पक्ष कार्यालयाबाहेर मी आत्मदहन करेन. हे मी खरंच करणार आहे. जिथं माझा मुलगा नाही, तिथं मला पण जगण्याची इच्छा नाहीये. आम्ही काहीही केलं नसताना तुम्ही आमच्या मुलाला मारलं. त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. घर सुनं केलं. त्यामुळे मी शांत बसणार नाही. मी आत्मदहन केलं तर याला आंदेकरांना तिकीट देणारा पक्षच जबाबदार असणार आहे.
advertisement
तुम्हाला पक्षानं तिकीट दिलं नाही तर तुम्ही अपक्ष निवडणूक लढणार का? असं विचारलं असता कोमकर पुढे म्हणाल्या, अपक्ष लढणं सोपी गोष्ट नाही. आमच्याकडे पॉवर नाहीये. आमची लोकही बाहेर नाहीयेत. त्यामुळे मी काही निर्णय घतला नाही. आम्हाला तिकीट द्यावं, एक संधी द्यावी, मी अन्यायाविरोधात लढण्याचा प्रयत्न करतेय. त्यामुळे लोकांनी माझी तळमळ समजून घ्यावी. एका आईच्या पाठीशी उभं राहावं.
advertisement
गणेश कोमकर फॉर्म भरणार का? यावर कल्याणी कोमकर म्हणाल्या, "ते फॉर्म भरणार आहेत की नाही, हे मी आता सांगू शकणार नाही. आमचं झालं तर फॉर्म भरू. त्यानंतर चित्र स्पष्ट होईल. तयारी केली आहे. आंदेकरांना परवानगी दिली म्हणजे आम्हाला पण परवानगी द्यायला पाहिजे ना... मी तसा अर्ज केला आहे. माझ्या पतीनं काहीही केलं नाही, आण्णांनी त्यांना गोवलं आहे. आम्ही आमच्या भावाची सुपारी का देऊ, यात आम्ही काही केलं नाही. आम्हाला यातून काय फायदा होणार आहे. असं कुठली बहीण करेन, असं आम्ही केलं नाही आणि केलं असेल तर कुणी बघितलं? अजून एकही पुरावा नाही भेटला. तरी आम्ही वर्षभरापासून भोगतोय."
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'मुलाला मारलं तिथेच नाती संपली', बंडू आंदेकरनंतर गणेश कोमकरही निवडणुकीच्या रिंगणात, पत्नीकडून अर्ज दाखल
Next Article
advertisement
ZP Election Maharashtra: महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत जिल्हा परिषद निवडणुकीचा धुरळा, मतदान कधी? मोठी अपडेट...
महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत जिल्हा परिषद निवडणुकीचा धुरळा, मतदान कधी? मोठी
  • नगर परिषद, नगर पालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता महापालिका निवडणुकीची रणधुमाळी

  • दुसरीकडे जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचाही धुरळा लवकरच उडणार असल्याचे वृत्त समोर

  • महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होणार अ

View All
advertisement