'तो' मेसेज पाठवून पोलिसालाच गंडवलं; पुण्यात सायबर चोरट्यांची नवी शक्कल, कोणाला शंकाही येणार नाही

Last Updated:

केडगाव येथील एक पोलीस अधिकारी आणि कुरकुंभ येथील एका शिक्षकाला या सायबर हल्ल्याचा फटका बसला आहे.

सायबर चोरट्यांनी गंडवलं (AI image)
सायबर चोरट्यांनी गंडवलं (AI image)
पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीची एक नवी आणि अत्यंत घातक पद्धत अवलंबली आहे. 'ई-चलन' भरण्याच्या नावाखाली नागरिकांचे मोबाईल हॅक केले जात आहेत. केडगाव येथील एक पोलीस अधिकारी आणि कुरकुंभ येथील एका शिक्षकाला या सायबर हल्ल्याचा फटका बसला असून, त्यांच्या मोबाईलचा ताबा घेऊन मित्रपरिवाराकडे पैशांची मागणी करण्यात आली आहे.
फसवणुकीची पद्धत : सायबर भामटे व्हॉट्सअॅप किंवा टेलिग्रामवर 'तुमच्या गाडीचे ई-चलन भरा' असा संदेश पाठवतात. यासोबत एक APK फाईल जोडलेली असते. ही फाईल उघडताच मोबाईलमध्ये आपोआप तीन संशयास्पद अॅप्लिकेशन्स इन्स्टॉल होतात. यानंतर मोबाईलचा संपूर्ण ताबा हॅकर्सकडे जातो. हॅकर्स मोबाईलमधील कॉन्टॅक्ट लिस्टचा वापर करून संबंधित व्यक्तीच्या डीपीसह "मी हॉस्पिटलमध्ये असून तातडीने पैशांची गरज आहे" असे मेसेज पाठवून आर्थिक फसवणूक करतात.
advertisement
यवत पोलीस ठाण्याचे निरीक्षक नारायण देशमुख यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. "सरकारी यंत्रणा कधीही एपीके (APK) फाईलद्वारे दंड भरण्यास सांगत नाहीत. त्यामुळे अनोळखी व्यक्तीने पाठवलेली लिंक किंवा फाईल चुकूनही उघडू नका," असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
advertisement
स्वतःचा बचाव कसा कराल?
अधिकृत स्रोतांचाच वापर करा: ई-चलन पाहण्यासाठी फक्त अधिकृत 'महाट्रॅफिक' अॅप किंवा सरकारच्या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करा.
APK फाईल टाळा: व्हॉट्सअॅपवर आलेली कोणतीही फाईल (विशेषतः .apk फॉरमॅटमधील) डाउनलोड करू नका.
घाई करू नका: "दंड भरा नाहीतर कारवाई होईल" अशा धमकावणाऱ्या मेसेजला तातडीने प्रतिसाद न देता खात्री करा.
advertisement
ओळख पटवा: ओळखीच्या व्यक्तीने पैशांची मागणी केल्यास प्रथम त्यांना फोन करून खात्री करा, कारण त्यांचे खाते हॅक झालेले असू शकते.
फसवणूक झाल्यास काय करावे?
१९३० या सायबर क्राईम हेल्पलाईन क्रमांकावर तातडीने संपर्क साधा. www.cybercrime.gov.in या पोर्टलवर तक्रार नोंदवा. तातडीने इंटरनेट बंद करा आणि बँकेचे व्यवहार/युपीआय पिन ब्लॉक करा.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
'तो' मेसेज पाठवून पोलिसालाच गंडवलं; पुण्यात सायबर चोरट्यांची नवी शक्कल, कोणाला शंकाही येणार नाही
Next Article
advertisement
ZP Election Maharashtra: महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत जिल्हा परिषद निवडणुकीचा धुरळा, मतदान कधी? मोठी अपडेट...
महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत जिल्हा परिषद निवडणुकीचा धुरळा, मतदान कधी? मोठी
  • नगर परिषद, नगर पालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता महापालिका निवडणुकीची रणधुमाळी

  • दुसरीकडे जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचाही धुरळा लवकरच उडणार असल्याचे वृत्त समोर

  • महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होणार अ

View All
advertisement