साहेबांना भनक लागली, पण एसीबीने परळीत गेमच उलटवला, तहसीलदार मुंडेवर मोठी कारवाई
- Reported by:SURESH JADHAV
- Published by:Prachi Amale
Last Updated:
काम करून देण्यासाठी तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी सुरुवातीला 50 हजार रुपयांची मागणी केली होती.
बीड : बीड जिल्ह्यातील परळी येथील तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे. एका तक्रारदाराकडून 50 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून, या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या प्रकरणातील काम करून देण्यासाठी तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी सुरुवातीला 50 हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र, तक्रारदाराच्या विनंतीनंतर 20 हजार रुपयांत तडजोड झाल्याचे समोर आले आहे. लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदाराने याबाबत थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर एसीबीने सापळा रचून कारवाई करण्याचे ठरवले.
advertisement
लाच स्वीकारली नाही पण पुरावे आढळले
दरम्यान, कारवाईची कुणकुण लागल्याने तहसीलदार मुंडे यांनी प्रत्यक्षात लाच रक्कम स्वीकारली नाही. तरीदेखील तक्रारदाराकडून लाचेची मागणी केल्याचे पुरावे एसीबीच्या तपासात निष्पन्न झाल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या त्यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
कठोर कारवाईची मागणी
या कारवाईनंतर परळी तहसील कार्यालयात एकच खळबळ उडाली असून, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तहसीलदारासारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर लाच मागितल्याचा आरोप झाल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्येही संतापाची भावना व्यक्त केली जात आहे. अनेक नागरिकांनी एसीबीच्या कारवाईचे स्वागत करत, प्रशासनातील भ्रष्टाचारावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
advertisement
तपासातून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता
दरम्यान, एसीबीचे अधिकारी या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, यामागे आणखी कोणी सहभागी आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्यावर यापूर्वीही अशा स्वरूपाच्या तक्रारी होत्या का, याची चौकशी केली जात आहे. या प्रकरणामुळे परळी तालुक्यातील प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पुढील तपासातून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
advertisement
नागरिकांमध्ये तीव्र नाराजी
या कारवाईनंतर पोलीस दलात खळबळ उडाली असून, प्रामाणिकपणाचा बुरखा पांघरून नागरिकांकडून लाच उकळणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा एसीबीकडून देण्यात आला आहे. अधिकाऱ्यांकडूनच लाच मागितली जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अशा कारवायांमुळे भ्रष्टाचाराविरोधातील लढ्याला बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
advertisement
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 20, 2026 3:34 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
साहेबांना भनक लागली, पण एसीबीने परळीत गेमच उलटवला, तहसीलदार मुंडेवर मोठी कारवाई










