Ashwini Bhide : अश्विनी भिंडेंची बदली, मेट्रोतून थेट मंत्रालयात जाणार, मुख्यमंत्री कार्यालयात नवीन जबाबदारी सांभाळणार

Last Updated:

मेट्रोवूमन म्हणून कारकीर्द गाजवलेल्या अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आहे. त्यामुळे आता अश्विनी भिडे यांनी मेट्रोतून थेट मंत्रालयात जाणार आहे.

ashwini bhide
ashwini bhide
Ashwini Bhide News :मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक असणाऱ्या अश्विनी भिडे यांची बदली करण्यात आली आहे. मेट्रोवूमन म्हणून कारकीर्द गाजवलेल्या अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आहे. त्यामुळे आता अश्विनी भिडे यांनी मेट्रोतून थेट मंत्रालयात जाणार आहे. मेट्रोत असताना त्यांनी त्यांची जबाबदारी चोख पाळली होती.त्यामुळे आता त्या ही नवीन जबाबदारी कशा पार पाडतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
अश्विनी भिडे यांच्या नियुक्तीचे पत्रही समोर आले आहे. या पत्रात शासनाने आपली बदली केल्याची माहिती अश्विनी भिडे यांना देण्यात आली आहे. यासोबत मंत्रालयात मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मुंबई ब्रिजेश सिंह यांच्या जागी आपली नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आपण ब्रिजेश सिंह यांच्याकडून त्वरित पदभार स्विकारावा असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच पुढील आदेश येईपर्यंत मेट्रोच्या पदाचा कार्यभारही सांभाळावा, असे आदेश भिडे यांना देण्यात आले आहेत.
advertisement
दरम्यान याआधी मुख्यमंत्री कार्यालयाचा पदभार हा ब्रिजेश सिंग पाहत होते. मात्र आता मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवपदापासून ब्रिजेश सिंग यांना पदमुक्त करण्यात आलं आहे. त्यामुळे आता सिंग यांच्या जागी अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आहे. या आदेशानंतर त्यांना त्वरीत पदभार स्विकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ashwini Bhide : अश्विनी भिंडेंची बदली, मेट्रोतून थेट मंत्रालयात जाणार, मुख्यमंत्री कार्यालयात नवीन जबाबदारी सांभाळणार
Next Article
advertisement
Satej Patil : सतेज पाटलांना विरोधी पक्षनेते पद मिळू नये धडपड? प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन
प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..
  • प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..

  • प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..

  • प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..

View All
advertisement