ती पोलीस अधिकारी, तोही मोठ्या पोस्टवर, पण त्याने तिचे तुकडे केले; खाकीतला खुनी Y आणि U मुळे सापडला!
- Published by:Sachin S
Last Updated:
खाकी वर्दीतील पोलिसाने महिला पोलीस अधिकाऱ्याची हत्या केली, नुसती हत्या केली नाहीतर शरीराचे तुकडे करून वसईच्या खाडीत फेकून दिले.
सचिन जाधव, प्रतिनिधी
सातारा : एखाद्या क्राईम थ्रीलर सिनेमाला लाजवेल अशी घटना महाराष्ट्र पोलीस दलात समोर आली होती. दोघेही मोठ्या पदावरचे पोलीस अधिकारी, दोघेही विवाहित पण तरीही एकमेकांच्या प्रेमात पडले. पण, यातून बाहेर पडण्यासाठी खाकी वर्दीतील पोलिसाने महिला पोलीस अधिकाऱ्याची हत्या केली, नुसती हत्या केली नाहीतर शरीराचे तुकडे करून वसईच्या खाडीत फेकून दिले. तब्बल ९ वर्षांनंतर आरोपी पोलीस अधिकाऱ्याला अखेर शिक्षा झाली. पण, यामध्ये Y आणि U या दोन शब्दांमुळे वर्दीला हा खुनी पोलिसांच्या ताब्यात सापडला.
advertisement
हे प्रकरण आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे गोरे हत्याकांड. सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी न्यूज१८ लोकमतशी बातचीत केली. यावेळी त्यांनी अश्विनी बिद्रे गोरे यांच्या हत्येचा तपास कसा लागला, पोलिसांनी काय क्लुप्त्या वापरल्या याबाबत तुषार दोषी यांनी माहिती दिली.
'2016 मध्ये अश्विनी बिद्रे गोरे या मिसिंग झाल्याची तक्रार एका पोलीस स्टेशनला दाखल झाली होती. तेव्हा पोलीस इन्स्पेक्टर असलेले अभय कुरुलकर याने तिचं अपहरण केल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी दिली होती. पुराव्यात त्यांचं भांडण झाल्याचं आणि त्यांचं शेवटचं लोकेशन ही एकत्र येत होतं. या तपासात पुढे अभय कुरुलकर ला अटक करण्यात आली होती. 2017 मध्ये गुन्हा दाखल होऊन 2018 चार्ज शीट दाखल झाली. ती कुठे आहे याचा शोध न लागल्यामुळे तपास नंतर तसाच राहिला होता.
advertisement
हायकोर्टाच्या आदेशाने तो तपास क्राइम ब्रांचकडे आला. तत्कालीन एसीपी क्राईमचे राऊत हे तेव्हा आयओ झाले. मी तेव्हा डीसीपी क्राईमला होतो. सहाय्यक आयओ म्हणून संगीता अल्फान्सो यांना देण्यात आलं होतं. आम्ही तेव्हा दीड ते पावणे दोन वर्षांच्या तपासाचा आढावा घेतला. कुरुलकरचा खाजगी ड्रायव्हर कुंदन भंडारी, अभय कुरुलकर आणि त्याचा मित्र महेश फळणीकर या तिघांचे लोकेशन स्टेटमेंट आणि त्यांनी पोलिसांसमोर दिलेले स्टेटमेंट कॉल डिटेल्स रेकॉर्ड तपासले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आलं. कुरुलकर याने ड्रायव्हरला बॅगा विकत घ्यायला सांगितल्या होत्या.
advertisement
Y आणि U मुळे आरोपी सापडला
'कुरुलकर याने अश्विनी बिद्रे गोरे यांच्या प्रेताचे तुकडे केले. हे तुकडे त्या खाडीत टाकण्यात आले होते. यानंतर अश्विनी बिद्रे गोरे यांच्या मोबाईलवरून अभय कुरुलकर याने नातेवाईकांच्या आणि ऑफिसच्या मोबाईलवर मी विपश्यनेला चालले असल्याचे मेसेज पाठवले होते. तपासामध्ये एक गोष्ट ध्यानात आली होती. त्यांने जो मेसेज केला होता, त्यात कुरुलकर you ला Y वापरायचा आणि महिला you ला ओन्ली U हे अक्षर वापरायची. स्टाईलोग्राफी या सगळ्याचा उपयोग करून चार्जशीट दाखल करण्यात आलं. यात सेशन ट्रायल कोर्टाने अभय कुरुलकर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
advertisement
दोन वर्षांनी या गुन्हाचा छडा लागला होता. मृतदेह नसताना, हत्यार नसताना, कोणी पाहिलं नसताना सुद्धा या हत्येचा छडा लावण्यात आम्ही यशस्वी झालो. कोणताच क्राईम हा परफेक्ट नसतो त्यामुळे पोलीस तो क्राईम शोधण्यात यशस्वी होतातच, असं दोशी यांनी सांगितलं.
काय आहे नेमकं प्रकरण?
अश्विनी ब्रिदे 11 एप्रिल 2016 रोजी बेपत्ता झाल्या होत्या. घटनेच्या दिवशी सायंकाळी सातच्या सुमारास त्या अभय कुरूंदकरला भेटायला पोलीस ठाण्यात गेल्या होत्या. यानंतर अभय कुरूंदकर हे बिद्रे यांना कारमध्ये घेऊन भाईदरच्या दिशेने रवाना गेला. याचवेळी कारमध्येच कुरूंदकरने बिद्रे यांची गळा दाबून हत्या केली. त्यावेळी त्याच्यासमवेत महेश फळणीकर असल्याचं देखील समोर आलं होतं.
advertisement
ही घटना 11 एप्रिल 2016 रोजी सायंकाळी 6. 41 ते रात्री 11.11 च्या दरम्यान घडली. त्यानंतर रात्री 11.18 वाजता बिद्रे यांचा मोबाईल बंद झाला. हत्या केल्यानंतर आरोपीनं लाकडं कापायच्या कटरने अश्विनी यांच्या शरीराचे तुकडे केले. कुरूंदकर आणि फळणीकरने राजू पाटील आणि खासगी चालकाला सोबत घेत मध्यरात्री अश्विनी बिद्रेचे तुकडे कारमधून वसईच्या खाडीत फेकला.
advertisement
अश्विनी बिद्रेंचा खून का?
अश्विनी बिद्रे या २००५ मध्ये पोलीस दलात रुजू झाल्या होत्या. त्या सांगलीत पोस्टिंग असताना मुख्य आरोपी अभय कुरुंदकरशी त्यांची ओळख झाली होती. दोघंही विवाहित असून दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. अश्विनी बिद्रे आणि अभय कुरूंदकर दोघांनाही मुलं होती. कुरूंदकरने आपल्या पत्नीला घटस्फोट देऊन बिद्रे यांच्यासोबत लग्न करण्याचे वचन दिले. त्यामुळे अश्विनी यांनी पती राजू गोरे यांच्यासोबतचे संबंध तोडले. अश्विनीला राजू गोरेपासून एक मुलगी आहे. जी आपल्या पित्याकडे राहते.
पतीपासून वेगळं झाल्यानंतर अश्विनी यांनी अभय कुरूंदकरकडे लग्नाचा तगादा लावला. मात्र, कुरूंदकरला अश्विनीशी लग्न करायचं नव्हतं. त्यावरुनच कुरुंदकर आणि बिद्रे यांच्यात रोजच भांडणे होऊ लागली. मात्र कुरूंदकर पहिल्या पत्नीला आणि मुलांना सोडू शकत नव्हता. त्यामुळे त्याने अश्विनीची हत्या करण्याचा डाव रचला. यासाठी त्याने बालपणीचा मित्र महेश फळणीकर याला सोबत घेतले आणि अश्विनीची हत्या केली. या प्रकरणात या दोघांना राजू पाटील आणि कारचालक कुंदन भांडारी याने साथ दिली.
view commentsLocation :
Satara,Maharashtra
First Published :
October 29, 2025 10:49 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ती पोलीस अधिकारी, तोही मोठ्या पोस्टवर, पण त्याने तिचे तुकडे केले; खाकीतला खुनी Y आणि U मुळे सापडला!


