Chhatrapati Sambhajinagar : एका क्षणात आयुष्य बदललं! थायलंडमध्ये 'नोकरी'चे स्वप्न दाखवलं अन्...; संभाजीनगरच्या तरुणीसोबत भयंकर घडलं
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- local18
- Published by:Tanvi
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar Crime : थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून संभाजीनगरच्या तरुणीला विक्रीसाठी नेण्यात आले होते. मात्र, भारतीय दूतावास आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने तिची थरारक सुटका करण्यात आली
छत्रपती संभाजीनगर : परदेशात चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याचं स्वप्न दाखवत एका तरुणीला थेट “चॅटिंग स्कॅम” कंपनीत विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. थायलंड आणि कंबोडियामध्ये दोन महिने अडकून पडलेल्या या तरुणीने तब्बल दोन हजार डॉलर्स भरून स्वतःची सुटका करून घेतली. भारतात परतल्यावर तिने आरोपीविरुद्ध पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, या प्रकरणाने शहरात खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 29 वर्षीय घटस्फोटित महिला नोकरीच्या शोधात शहरात आली होती. वृत्तपत्रातील जाहिरातीवरून एफ व्होल्ट, शंकरा रेसीडन्सी, उल्कानगरी रोड, निअर ऑगस्ट होम, श्रीनगर, गारखेडा या कंपनीत नोकरी मिळाली. कंपनीचा मालक अविनाश रामभाऊ उढाण याच्याशी ओळख वाढल्यानंतर त्याने थायलंडमध्ये मार्केटिंग मॅनेजर म्हणून उच्च वेतनाची नोकरी असल्याचं सांगून तिचा विश्वास संपादन केला. त्यासाठी दीड लाख रुपये घेतल्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात तिला दिल्ली विमानतळावरून थायलंडला पाठवण्यात आलं.
advertisement
बँकॉक विमानतळावर पोहोचल्यावर हरपीत सिंग नावाच्या व्यक्तीने तिला रिसिव्ह करून कंबोडियातील क्रिएटिव्ह माईंडसेट या कंपनीत नेऊन सोडलं. तेथे महिलेच्या हातून फसवणुकीच्या चॅटिंग स्कॅमचे काम करून घेतले जात असल्याचे तिला लक्षात आले. अविनाश उढाण याने स्वतःच तिची विक्री केल्याचा धक्कादायक खुलासा या दरम्यान झाला. दोन महिन्यांनी तीने 2 हजार यूएस डॉलर्स देऊन तेथून सुटका केली आणि भारतीय दूतावासाच्या मदतीने 21 ऑक्टोबर रोजी भारतात परतली.
advertisement
मुंबई विमानतळावर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी तिची चौकशी केली असता, तिला या कामाच्या स्वरूपाबद्दल काहीही माहिती देण्यात आली नव्हती, असे उघड झाले. त्यानंतर सहार पोलिस ठाण्यात अविनाश उढाण याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परदेशातील नोकरीच्या नावाखाली सुरू असलेल्या फसवणूक रॅकेट्सबद्दल गंभीर चिंता व्यक्त होत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 29, 2025 9:33 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/औरंगाबाद/
Chhatrapati Sambhajinagar : एका क्षणात आयुष्य बदललं! थायलंडमध्ये 'नोकरी'चे स्वप्न दाखवलं अन्...; संभाजीनगरच्या तरुणीसोबत भयंकर घडलं










