धावत्या जीपमध्ये अक्षय शिंदेचा गेम, मुंब्रा बायपासवर नेमकं काय घडलं? ए टू झेड माहिती

Last Updated:

बदलापूरच्या शाळेमध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेने स्वत:वर गोळ्या झाडून घेतल्या आहेत, यामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे

धावत्या जीपमध्ये अक्षय शिंदेचा गेम, मुंब्रा बायपासवर नेमकं काय घडलं? ए टू झेड माहिती
धावत्या जीपमध्ये अक्षय शिंदेचा गेम, मुंब्रा बायपासवर नेमकं काय घडलं? ए टू झेड माहिती
मुंबई : बदलापूरच्या शाळेमध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेने स्वत:वर गोळ्या झाडून घेतल्या आहेत, यामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे, तर एका पोलिसालाही गोळी लागली आहे. तळोजा कारागृहातून रिमांडसाठी नेत असताना पोलिसांच्या जीपमध्ये ही घटना घडली आहे. मुंब्रा बायपासजवळून जात असताना आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांची सर्व्हिस रिव्हॉल्वहर खेचली. एपीआय निलेश मोरे यांच्याकडे असलेली रिव्हॉल्वहर अक्षयने खेचली आणि निलेश मोरे यांच्यावर 3 गोळ्या फायर केल्या. यातील एक गोळी निलेश मोरे यांच्या पायात गेली, तर दोन गोळ्यांचा अंदाज चुकला.
अक्षय शिंदेने गोळीबार केल्यानंतर त्या परिस्थितीमध्येही निलेश मोरे यांनी अक्षयवर हल्ला केला. संध्याकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. पोलिसांच्या जीपमध्ये असलेले दुसरे अधिकारी, पोलीस निरिक्षक संजय शिंदे यांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला. संजय शिंदे यांनी स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉल्वहरमधून अक्षय शिंदेवर दोन गोळ्या फायर केल्या. यातील एक गोळी अक्षय शिंदेच्या डोक्याला तर दुसरी शरिरावर लागली आहे.
advertisement
गोळीबारामध्ये जखमी झालेला अक्षय शिंदे आणि एपीआय निलेश मोरे यांना कळव्याच्या शिवाजी रुग्णालयात नेण्यात आलं आहे. यामध्ये अक्षयचा मृत्यू झाल्याची खात्रीलायक माहिती आहे, पोलिसांनी मात्र अद्याप दुजोरा दिलेला नाही. अक्षयने गोळीबार करेला तेव्हा गाडीमध्ये त्याच्यासोबत पोलीस पथकातले चार जण होते, ज्यात दोन अधिकारी आणि दोन अंमलदार होते.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
धावत्या जीपमध्ये अक्षय शिंदेचा गेम, मुंब्रा बायपासवर नेमकं काय घडलं? ए टू झेड माहिती
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement