advertisement

काळजाचा तुकडा गेला अन् माऊली कोलमडली! पिंकी माळीच्या निधनाचा धक्का,आईची रुग्णालयात मृत्यूशी झुंज

Last Updated:

बारमतीच्या अपघातात मुलीला गमावल्यानंतर आता पत्नीला वाचवण्यासाठी  पिंकीचे वडील धावपळ करत आहेत.

News18
News18
मुंबई :  अजित पवारांच्या अपघाती निधनाला एक महिना पूर्ण झाला असून अपघातात अजित पवारांसह इतर चार जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यातील एक म्हणजे केबिन ग्रुप म्हणून काम करणारी पिंकी माळी..  या दुर्घटनेत एकूण पाच जणांचा बळी गेला होता. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, सुरक्षा रक्षक विदीप जाधव, फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी, पायलट कॅप्टन सुमित कपूर आणि सह-पायलट कॅप्टन शांभवी पाठक यांचा समावेश होता. या अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला असतानाच, मुंबईतील माळी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
या अपघातात तरुण फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. मुलीच्या आकस्मिक निधनाचा जबरदस्त मानसिक धक्का त्यांच्या आई माया माळी यांना बसला आहे. गेल्या महिन्याभरापासून त्या सतत मानसिक तणावाखाली असून, मुलीच्या जाण्याचे दु:ख सहन न झाल्याने त्या अक्षरशः कोलमडून गेल्या आहेत. या तीव्र मानसिक धक्क्यामुळे त्यांची प्रकृती अचानक खालावली असून, त्यांना उपचारासाठी दादर येथील शुश्रूषा सिटीझन्स को-ऑपरेटिव्ह हॉस्पिटल लिमिटेडमध्ये दाखल करण्यात आले आहे.
advertisement

पत्नीच्या जीवासाठी झुंज

गेल्या सहा दिवसांपासून माया माळी यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मात्र, उपचारांचा खर्च लाखांच्या घरात गेल्याने कुटुंबासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. पिंकीचे वडील टॅक्सीचालक असून, मर्यादित उत्पन्नातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आधी मुलीचा अचानक मृत्यू आणि आता पत्नीच्या जीवासाठी सुरू असलेली झुंज, यामुळे त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे.
advertisement

माळी कुटुंबावर दु:खाचा मोठा

पत्नीवर योग्य उपचार व्हावेत आणि रुग्णालयाचे वाढते बिल भरता यावे, यासाठी पिंकी माळी यांच्या वडिलांनी मित्रपरिवार, नातेवाईक तसेच विविध समाजसंस्थांकडे मदतीची याचना केली आहे. मुलगी गेली, आता तरी पत्नीला वाचवा, अशी आर्त हाक त्यांनी दिली असून, त्यांच्या डोळ्यांतून अश्रू थांबण्याचे नाव घेत नाहीत. या घटनेमुळे संपूर्ण माळी कुटुंबावर दु:खाचा मोठा आघात झाला आहे. रुग्णालयाचे बिल भरण्यासाठी आणि पत्नीवर योग्य उपचार होण्यासाठी त्यांना तातडीच्या मदतीची आवश्यकता आहे.  आपल्या मुलगी पिंकीला गमावल्यानंतर आता पत्नीला वाचवण्यासाठी  पिंकीचे वडील धावपळ करत आहेत.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
काळजाचा तुकडा गेला अन् माऊली कोलमडली! पिंकी माळीच्या निधनाचा धक्का,आईची रुग्णालयात मृत्यूशी झुंज
Next Article
advertisement
इराणविरुद्धचे युद्ध जिंकणे अमेरिकेच्या औकातीबाहेर, चक्रव्यूहात फसला 'सुपरपॉवर'; ट्रम्प यांनी केली जगातील सर्वात मोठी लष्करी घोडचूक
इराणविरुद्धचे युद्ध जिंकणे अमेरिकेच्या औकातीबाहेर, चक्रव्यूहात फसला 'सुपरपॉवर'
  • इराण म्हणजे व्हेनेझुएला नाही!

  • अमेरिकेने छेडला मधमाश्यांचा मोहोळ

  • डोनाल्ड ट्रम्प यांचा आत्मघातकी डाव

View All
advertisement