आमदारकीला पराभूत झालेल्या राऊतांच्या अंगावर गुलाल पडला, बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीत 18 पैकी 18 जागांवर विजय
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी आमदार तथा भाजप नेते राजेंद्र राऊत यांच्या गटाने झेंडा फडकवला.
प्रीतम पंडित, प्रतिनिधी, सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी आमदार राजेंद्र राऊत गटाने दणदणीत विजय मिळवला आहे. 18 पैकी 18 जागांवर विजय मिळवत आमदार दिलीप सोपल गटाचा सुपडा साफ केला आहे.
बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी आमदार तथा भाजप नेते राजेंद्र राऊत यांच्या गटाने झेंडा फडकवला. यंदाच्या बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी 96.98 टक्के इतके विक्रमी मतदानाची नोंद झाली होती. वाढलेल्या मतदानाचा टक्का माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या बाजूने झुकल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले आहे.
राऊत गटाचा दणदणीत विजय, विजयी उमेदवार गुलालाने माखले
advertisement
बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत माजी आमदार राजेंद्र राऊत आणि विद्यमान आमदार दिलीप सोपल गटात सामना रंगला होता. मात्र मतदारांनी राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवन पॅनेलच्या सगळ्याच उमेदवारांना मतदान करून १८ पैकी १८ जागांवर विजय मिळवला. राऊत गटाने दणदणीत विजय मिळवल्यानंतर बार्शीत मोठ्या जल्लोषाला सुरुवात झाली आहे. विजयी उमेदवार गुलालाने माखून गेले आहेत.
advertisement
सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुके व मराठवाड्यातील बऱ्याच जिल्ह्यातून उदाहरणार्थ लातूर, बीड, धाराशिव, अहमदनगर या जिल्ह्यातील अनेक तालुक्यातून शेतमाल विक्रीसाठी बार्शी बाजार समितीमध्ये येतो. त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळते.
मतदारांनी आमच्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. येणाऱ्या काळात कृषि उत्पन्न बाजार समितीसंदर्भात अतिशय चांगले निर्णय घेऊ, असे निकालानंतर राजेंद्र राऊत म्हणाले.
advertisement
आमदारकीला पराभूत झालेल्या राऊतांच्या अंगावर गुलाल पडला
गतसाली झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजेंद्र राऊत यांचा पराभव झाला. दिलीप सोपल यांनी जाहीर केल्याप्रमाणे त्यांच्या अखेरच्या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला. आमदारकीला पराभूत झालेल्या राजेंद्र राऊतांच्या अंगावर बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक निकालामुळे गुलाल पडला.
view commentsLocation :
Barshi,Solapur,Maharashtra
First Published :
December 08, 2025 6:08 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आमदारकीला पराभूत झालेल्या राऊतांच्या अंगावर गुलाल पडला, बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीत 18 पैकी 18 जागांवर विजय


