Beed Santosh Deshmukh Case : बीडमध्ये CID ने तळ ठोकला, सलग दुसऱ्या दिवशी चौकशी, देशमुख हत्याप्रकरणाचा उलगडा होणार?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा तपास आता सीआयडी करणार आहे. यासाठी सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बुर्डे आणि सीआयडीचे एसपी सचिन पाटील संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा उलगडा करण्यासाठी दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यात तळ ठोकून आहेत.
Beed Sarpanch Santosh Deshmukh Case : सुरेश जाधव, बीड : बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यानुसार गुरूवारपासून सीआयडीचे दोन बडे अधिकारी बीडमध्ये तळ ठोकून आहेत. हे अधिकारी आज हत्या व खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे यांची अर्ध्या तासापासून चौकशी करत आहेत. तसेच या हत्या प्रकरणाची अधिकारी घटनास्थळीही जाऊन पाहणी करणार आहेत.त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चौकशीला वेग आला आहे. त्यामुळे आता संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा उलगडा होणार आहे.
संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा तपास आता सीआयडी करणार आहे. यासाठी सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बुर्डे आणि सीआयडीचे एसपी सचिन पाटील संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा उलगडा करण्यासाठी दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यात तळ ठोकून आहेत. आज हत्या व खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे यांची चौकशी सुरू आहे. गेल्या अर्ध्या तासापासून ही चौकशी सूरू आहे.
advertisement
दरम्यान काल सुद्धा संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीने केला होता. तसेच सीआयीडीने बीडमधील पोलीस अधिकाऱ्यांची भेट देखील घेतली होती. तसेच या हत्येच्या मुळाशी पोहचण्यासाठी सीआयडी प्रत्यक्ष घटनास्थळावर जाऊन देखील पाहणी करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे सीआयडीने ज्याप्रकारे तपासाला वेग दिला आहे, त्यानुसार या हत्येचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपुर्वीच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून अत्यंत क्रुर पद्धतीने हत्या करण्यात आली होती. ही घटना समोर आल्यानंतर राजकारण चांगलेच तापले होते. तसेच या प्रकरणात पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पोलिस अधिक्षकांची बदली करण्यात आली होती. त्यानंतर आता बीडच्या पोलीस अध्यक्षपदी संजीव कावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
view commentsLocation :
Bid,Maharashtra
First Published :
December 27, 2024 1:53 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Beed Santosh Deshmukh Case : बीडमध्ये CID ने तळ ठोकला, सलग दुसऱ्या दिवशी चौकशी, देशमुख हत्याप्रकरणाचा उलगडा होणार?


