दारू पाजली, डोळ्यात चटणी टाकली अन्...., प्रियकराबोत मिळून पत्नीचं भयानक कांड, धाराशिवच्या घटनेनं खळबळ

Last Updated:

पत्नी आणि प्रियकर या दोघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

दारू पाजली, डोळ्यात चटणी टाकली अन्...., प्रियकराबोत मिळून पत्नीचं भयानक कांड, बीडच्या घटनेनं खळबळ
दारू पाजली, डोळ्यात चटणी टाकली अन्...., प्रियकराबोत मिळून पत्नीचं भयानक कांड, बीडच्या घटनेनं खळबळ
धाराशिव : नुकतेच उमरगा तालुक्यात एका खून प्रकरणाने खळबळ उडाली होती. अवघ्या 24 तासांत तपासाची चक्रे फिरवून पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला असून धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. मृत तरुणाचे नाव शाहूराज महादू सूर्यवंशी असे आहे. पत्नीने प्रियकराच्या मदतीने त्याचा काटा काढल्याचे तपासातून पुढे आले आहे.
शहराच्या बायपास मार्गालगत कोरेगाववाडी रस्त्यानजीक रविवारी सकाळी एका तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून झाल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत या गुन्ह्यामागील धक्कादायक सत्य समोर आणले आहे.
घटनास्थळी सापडलेल्या शर्टावर असलेल्या टेलरच्या नावामुळे मृताची ओळख पटवण्यात पोलिसांना मदत झाली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव शेलार व पोलिस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांनी पथकासह घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला. प्राथमिक तपासात हा खून पूर्वनियोजित असल्याचा संशय पोलिसांना होता.
advertisement
तपासादरम्यान मृताच्या कुटुंबीयांची चौकशी करण्यात आली. शाहूराजची पत्नी गौरी शाहूराज सूर्यवंशी हिने सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र तांत्रिक विश्लेषण, मोबाईल कॉल रेकॉर्ड्स आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शाहूराज एका व्यक्तीसोबत शेवटचे दिसल्याचे निष्पन्न झाले. यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला आणि चौकशीचा फास आवळताच गौरीने अखेर सत्य उघड केले.
advertisement
गौरी व शिवाजी दत्तू दुधनाळे (रा. त्रिकोळी) यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे तपासात समोर आले. शिवाजीच्या शेतात गौरी कामासाठी जात असल्याने त्यांच्यात ओळख वाढली व नंतर संबंध निर्माण झाले. शाहूराज हा दारूच्या नशेत पत्नीला वारंवार मारहाण करत असल्याचा आरोप गौरीने केला. या त्रासाला कंटाळून तसेच प्रेमसंबंधातील अडथळा दूर करण्यासाठी दोघांनी मिळून शाहूराजचा काटा काढण्याचा कट रचल्याचे उघड झाले.
advertisement
शनिवारी रात्री शिवाजीने शाहूराजला भेटून त्याला दारू पाजली व कोरेगाववाडी रस्त्यावर नेले. तेथे त्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून हंटर व दगडाने डोके ठेचत त्याची हत्या करण्यात आली. घटनेनंतर शिवाजी फरार झाला होता. मात्र सोमवारी पहाटे पोलिसांनी त्रिकोळी येथील शेतातून शिवाजीला ताब्यात घेतले. या प्रकरणी पत्नी गौरी आणि प्रियकर शिवाजी या दोघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास उमरगा पोलिस करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
दारू पाजली, डोळ्यात चटणी टाकली अन्...., प्रियकराबोत मिळून पत्नीचं भयानक कांड, धाराशिवच्या घटनेनं खळबळ
Next Article
advertisement
Santosh Dhuri Attack Raj Thackeray: कमळ हाती घेताच संतोष धुरींचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल, मनातली खदखद काढली...
कमळ हाती घेताच संतोष धुरींचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल, मनातली खदखद काढली...
  • मनसेमध्ये नाराज असलेले संतोष धुरी यांनी आज अखेर भाजपात प्रवेश केला

  • संतोष धुरी यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ठाकरे बंधूंच्या युतीवर जोरदार हल्लाबोल

  • राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटासमोर मनसे सरेंडर केला असल्याचे धुरी यांनी म्हटल

View All
advertisement