advertisement

मुलगी पाहायला जाण्यास नकार, तरुणासह पती-पत्नीसोबत भयंकर घडलं, बीडमध्ये खळबळ

Last Updated:

Beed News: घरी कोणी नसल्यामुळे कृष्णाने त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिला. या कारणावरून तिघेही संतापले.

मुलगी पाहायला जाण्यास नकार, तरुणासह पती-पत्नीसोबत भयंकर घढलं, बीडमध्ये खळबळ
मुलगी पाहायला जाण्यास नकार, तरुणासह पती-पत्नीसोबत भयंकर घढलं, बीडमध्ये खळबळ
बीड: मुलगी पाहायला जाण्यास नकार दिल्याने एका तरुणावर हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये घडला आहे. लिंबागणेश येथे किरकोळ कारणावरून वाद झाला आणि तिघांनी एका तरुणावर हल्ला केला. यामध्ये जखमी तरुणाला वाचवण्यासाठी पुढे सरसावलेल्या पती-पत्नीलाही मारहाण करण्यात आली. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा रामदास थोरात (वय 21) हा 18 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास बाजारतळ परिसरातून आपल्या शेताकडे जात होता. त्यावेळी औदुंबर थोरात, विशाल थोरात आणि बाळू थोरात या तिघांनी त्याला रस्त्यात अडवले. त्यांनी कृष्णाला एका मुलीला पाहण्यासाठी सोबत येण्याची विनंती केली.
advertisement
घरी कोणी नसल्यामुळे कृष्णाने त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिला. या कारणावरून तिघेही संतापले आणि त्यांनी कृष्णाला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली, तसेच लोखंडी गजाने चेहऱ्यावर प्रहार केल्याने तो जखमी झाला.
घटनेदरम्यान झालेल्या आरडाओरडीनंतर महादेव थोरात आणि त्यांची पत्नी दिपाली थोरात हे भांडण सोडवण्यासाठी धावून आले. मात्र, आरोपींनी त्यांनाही सोडले नाही. दिपाली यांच्या हातावर काठीने मारहाण करण्यात आली, तर दोघांनाही धमक्या देण्यात आल्या. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
advertisement
या घटनेनंतर कृष्णा थोरात यांनी नेकनूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून औदुंबर, विशाल आणि बाळू थोरात यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
मुलगी पाहायला जाण्यास नकार, तरुणासह पती-पत्नीसोबत भयंकर घडलं, बीडमध्ये खळबळ
Next Article
जगातील सर्वात आनंदी देश फिनलंड, सर्वात दुःखी कोण? भारताचा आनंद नेमका कुठे अडकला? या वर्षी पाकिस्तानच्या मागे
जगातील सर्वात आनंदी देश फिनलंड, सर्वात दुःखी कोण? भारताचा आनंद नेमका कुठे अडकला?
  • आर्थिक संकटात असलेला पाकिस्तान भारतापेक्षा जास्त आनंदी?

  • 'वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट' वाचून चक्रावून जाल

  • सर्वात आनंदी देश फिनलंड, तर सर्वात दुःखी अफगाणिस्तान

View All
advertisement