Maharashtra Kesari 2026: 3 माजी विजेते बाहेर; सिकंदर, हर्षवर्धन, महेंद्र की जय? आज ठरणार राज्याचा नवा 'महाराष्ट्र केसरी'
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावणाऱ्या मल्लावर बक्षिसांचा वर्षाव होणार असून, त्याला मानाची चांदीची गदा, ५ लाख रुपये रोख आणि आलिशान फॉर्च्युनर गाडी देऊन गौरविण्यात येणार आहे.
पुणे : कुस्ती शौकिनांच्या नजरा आज पुण्याच्या वाघोलीकडे लागल्या आहेत. ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा आज 'ग्रँड फिनाले' पार पडणार आहे आणि राज्याला नवा 'महाराष्ट्र केसरी' मिळणार आहे. रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांच्या वतीने आयोजित या भव्य स्पर्धेत आज माती आणि गादी अशा दोन्ही विभागात काट्याची टक्कर पाहायला मिळणार आहे.

अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट
अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या उपांत्य फेरीत दिग्गज मल्लांना पराभवाचा धक्का बसला. गतविजेता पृथ्वीराज मोहोळ, शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज पाटील यांसारखे माजी महाराष्ट्र केसरी स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. आता अंतिम फेरीत दोन तुल्यबळ लढती रंगतील
माती विभाग: वावटळ वेगाचा 'सिकंदर शेख' विरुद्ध सोलापूरचा 'महेंद्र गायकवाड'.
advertisement
गादी विभाग: माजी विजेता 'हर्षवर्धन सदगीर' विरुद्ध युवा तुर्क 'जय पाटील'.
यापैकी सिकंदर शेख आणि हर्षवर्धन सदगीर हे दोघेही 'डबल महाराष्ट्र केसरी' होण्याच्या जिद्दीने मैदानात उतरणार आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मानाची गदा आणि 'फॉर्च्युनर'
या स्पर्धेचे खास आकर्षण म्हणजे विजेत्याला मिळणारे बक्षीस. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज हा सोहळा रंगणार आहे. महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावणाऱ्या मल्लावर बक्षिसांचा वर्षाव होणार असून, त्याला मानाची चांदीची गदा, ५ लाख रुपये रोख आणि आलिशान फॉर्च्युनर गाडी देऊन गौरविण्यात येणार आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 22, 2026 10:49 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Maharashtra Kesari 2026: 3 माजी विजेते बाहेर; सिकंदर, हर्षवर्धन, महेंद्र की जय? आज ठरणार राज्याचा नवा 'महाराष्ट्र केसरी'








