Uddhav Thackeray: संजय राऊतांच्या घरी दिल्लीत काय शिजलं? खासदारांच्या 'मन की बात'ने ठाकरे अलर्ट मोडवर, मातोश्रीवर आज तातडीनं खलबतं
- Reported by:Sumit Sawant
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Uddhav Thackeray: संजय राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झालेल्या बैठकीत खासदारांनी थेट नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय! "उद्धवजी भेटत नाहीत आणि आदित्य ठाकरे फिरत नाहीत..." या खासदारांच्या 'मन की बात'मुळे मातोश्रीवर आता तातडीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या 'ऑपरेशन टायगर'ची जोरदार चर्चा सुरू असतानाच, शिवसेना (ठाकरे गट) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी पक्षाच्या सर्व खासदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले असून, पक्षांतर्गत नाराजी चव्हाट्यावर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर गेले होते. त्यांच्या या दौऱ्यानंतर पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली होती. आता उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
दिल्लीतील बैठकीचा 'आफ्टरइफेक्ट'?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी दिल्लीत संजय राऊत यांच्या निवासस्थानी ठाकरे गटाच्या खासदारांची एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीत खासदारांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली होती. "उद्धव ठाकरे खासदारांना भेटत नाहीत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाकडून अपेक्षित मदत मिळाली नाही," अशा तक्रारींचा पाढा खासदारांनी वरिष्ठ नेत्यांसमोर वाचला होता.
advertisement
आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावरूनही सवाल
याच बैठकीत खासदारांनी थेट नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. "जर उद्धव ठाकरेंना प्रकृती किंवा इतर कारणांमुळे काही मर्यादा असतील, तर आदित्य ठाकरे संपूर्ण महाराष्ट्र का फिरत नाहीत?" असा रोखठोक सवालही खासदारांनी विचारला होता. खासदारांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी स्वतः मैदानात उतरत ही बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर ठाकरे गटात सगळं काही आलबेल नाही, यावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात येत आहे.
advertisement
'ऑपरेशन टायगर'च्या माध्यमातून पक्षात पुन्हा एकदा मोठी फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा असताना, उद्धव ठाकरे आपल्या शिलेदारांना एकत्र राखण्यात यशस्वी होतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 22, 2026 10:40 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Uddhav Thackeray: संजय राऊतांच्या घरी दिल्लीत काय शिजलं? खासदारांच्या 'मन की बात'ने ठाकरे अलर्ट मोडवर, मातोश्रीवर आज तातडीनं खलबतं








