Manoj Jarange Patil : '..तर मराठे त्यांना कचका दाखवतील' जरांगे पाटलांचा पुन्हा राज्य सरकारला इशारा
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Manoj Jarange Patil : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला इशारा दिला आहे. ते बीडमध्ये बोलत होते.
जालना, (रवी जैस्वाल, प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीच्या धामधूमीत मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेते पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी राज्यात मराठ्यांची संख्या केवळ दहा ते बारा टक्के असल्याची टीका केली होती. यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार उत्तर दिलंय. प्रकाश शेंडगेंनी आम्हाला गणिताचे धडे देण्याची गरज नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी प्रकाश शेंडगेंना दिला. त्याचवेळी मला अटक केल्यावर मराठे त्यांना कचका दाखवतील, असा इशाराही राज्य सरकारला दिला आहे.
प्रकाश शेंडगे यांचा मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा
राज्यात मराठ्यांची संख्या केवळ दहा ते बारा टक्के असल्याची टीका ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी जालन्यातील पत्रकार परिषदेत केली होती. त्यावर मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिउत्तर दिलंय. तुम्ही गोरगरीब धनगर बांधवांसाठी लढलं पाहिजे. तेव्हा आम्ही तुमचं स्वागत करू, आमचं स्वागत करणारे तुम्ही कोण? असं जरांगे यांनी म्हंटलं. त्याचबरोबर येवल्याचा जसा चालतो, तसं तुम्ही चालता, असाही टोला मनोज जरांगे यांनी लगावला आहे.
advertisement
लोकसभेत आमचा कुणालाही पाठिंबा नाही : मनोज जरांगे पाटील
संभाजीनगर येथील सभेत उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषणात मनोज जरांगे पाटील यांचा उल्लेख केला होता. त्यावर बोलताना या लोकसभेच्या निवडणुकीत मी कुणालाही पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळं ज्यांना वाटतं आमच्यावर अन्याय झाला ते आमच्या बाजूनं बोलतील. अन्याय करूनही अन्याय झाला नसल्याचं ज्यांना वाटतं त्यांचं रक्त चेक करावं लागेल. पण मराठ्यांनी मत वाया न घालवता असं पाडा की त्याच्या पाच पिढ्या उभ्या राहिल्या नाही पाहिजे, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.
advertisement
बीडमध्ये तिरंगी सामना?
बीड लोकसभा (Beed Loksabha) मतदारसंघात यंदा चांगलीच चूरस वाढली आहे. निवडणुकीत जातीय रंग दिसून येत आहे. उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांचं केंद्रस्थान असल्याने बीड जिल्ह्यात मराठा समाजही निवडणूक प्रक्रियेत सक्रीय झाला आहे. बीडमध्ये पंकजा मुंडेंना (Pankaja Munde) महाविकास आघाडीच्या बंजरंग सोनवणेंचं आव्हान असून वंचित बहुजन आघाडीनेही येथील मतदारसंघात उमेदवार दिला आहे. त्यामुळे, येथील निवडणूक तिरंगी होत असली तरीही थेट लढत पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे (Bajrang Sonavane) यांच्यातच असणार आहे.
Location :
Bid,Bid,Maharashtra
First Published :
May 11, 2024 5:47 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
Manoj Jarange Patil : '..तर मराठे त्यांना कचका दाखवतील' जरांगे पाटलांचा पुन्हा राज्य सरकारला इशारा